उद्धव ठाकरेंकडून माजी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, तो खास फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 02:50 PM2020-07-22T14:50:29+5:302020-07-22T14:51:41+5:30

देवेंद्र फडणवीस यांचा आज 50 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना राज्यातील दिग्गज नेत्यांकडून, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Congratulations from Uddhav Thackeray to the former Chief Minister of the state, he shared a special photo | उद्धव ठाकरेंकडून माजी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, तो खास फोटो केला शेअर

उद्धव ठाकरेंकडून माजी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, तो खास फोटो केला शेअर

googlenewsNext
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांचा आज 50 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना राज्यातील दिग्गज नेत्यांकडून, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

मुंबई - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन्ही दिग्गज नेत्यांचा आज वाढदिवस आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन खास फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळाही दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचा आज 50 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना राज्यातील दिग्गज नेत्यांकडून, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. लॉकडाऊन आणि कोरोना महामारीच्या संकटामुळे सध्या ऑनलाईन शुभेच्छा देत त्यांच्या दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांच्यासोबत गप्पा मारतानाचा एक फोटो शेअर केला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा असं ठाकरेंनी या फोटोसह कॅप्शन दिलंय. विशेष म्हणजे हा फोटोही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाचाच असल्याचे दिसून येते. 

राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देताना मजेशीर ट्विट केलं आहे. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या परंपरेला साजेसे काम आपल्याकडून घडो, याच सदिच्छा..💐 असे पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करुन फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: Congratulations from Uddhav Thackeray to the former Chief Minister of the state, he shared a special photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.