'जनसुरक्षा' विरोधात मुंबईत परिषद; शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 09:10 IST2025-08-11T09:09:51+5:302025-08-11T09:10:39+5:30
१४ ऑगस्ट रोजी मुंबईत जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात परिषद

'जनसुरक्षा' विरोधात मुंबईत परिषद; शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
मुंबई : राज्यातील जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी मुंबईत जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात परिषद आयोजित केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उद्धवसेनेचे उद्धव ठाकरे व अन्य नेते या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
'मुस्कटदाबीविरोधात आवाज आवश्यक'
या संघर्ष समितीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, भारत जोडो अभियान, श्रमिक मुक्ती दल यांसह डावे प्रागतिक पक्ष व संघटनांचा समावेश आहे.