कंडक्टरांना ॲण्ड्रॉइड मशिनच चालवता येईना, डिजिटल ‘एसटी’त रोकड देऊन तिकीट घेण्याचा आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 09:43 AM2024-04-04T09:43:59+5:302024-04-04T09:44:34+5:30

Digital 'ST': ऑनलाइन पेमेंटच्या जमान्यात एसटी महामंडळाच्या ३४ हजारांपैकी १४ ते १५ हजार कंडक्टरांना ॲण्ड्रॉइड इलेक्ट्रिक तिकीट मशिन चालवता येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रोख पैसे देऊन प्रवाशांकडे तिकीट काढण्याचा आग्रह धरला जात आहे.

Conductors can't operate Android machines, urge to buy tickets by paying cash in digital 'ST' | कंडक्टरांना ॲण्ड्रॉइड मशिनच चालवता येईना, डिजिटल ‘एसटी’त रोकड देऊन तिकीट घेण्याचा आग्रह

कंडक्टरांना ॲण्ड्रॉइड मशिनच चालवता येईना, डिजिटल ‘एसटी’त रोकड देऊन तिकीट घेण्याचा आग्रह

मुंबई -  ऑनलाइन पेमेंटच्या जमान्यात एसटी महामंडळाच्या ३४ हजारांपैकी १४ ते १५ हजार कंडक्टरांना ॲण्ड्रॉइड इलेक्ट्रिक तिकीट मशिन चालवता येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रोख पैसे देऊन प्रवाशांकडे तिकीट काढण्याचा आग्रह धरला जात आहे. विशेषत: वय झालेल्या कंडक्टरांचा यात समावेश आहे. यावर उपाय म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

बदल्यात काळानुसार ‘एसटी महामंडळाने डिजिटल पेमेंटला प्राधान्य दिले. त्यानुसार राज्यभरातील ३४ हजार कंडक्टरांना ॲण्ड्रॉइड इलेक्ट्रिक तिकीट मशिन देण्यात आले. यामुळे प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढणे सोपे होत आहे. एसटीने रोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्या तुलनेत यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे. सध्या दिवसाला ५ ते ६ हजारच प्रवासी यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढत आहेत. मात्र, अजूनही बहुतेक कंडक्टरांना ॲण्ड्रॉइड इलेक्ट्रिक तिकीट मशिन व्यवस्थित चालवता येत नाहीत, अशी प्रवाशांची तक्रार आहे.

- अनेक वाहक प्रवाशांना रोख रकमेने तिकीट काढण्याचा आग्रह धरतात. कारण त्यांना  मशिनमध्ये यूपीआय पेमेंटवर तिकीट काढण्याचे योग्य प्रशिक्षण व्यवस्थित मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
- थेट पैसे बँकेत जमा
प्रवासी वाहतुकीतून एसटीला ४ ते ५ कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात रक्कम जमा होते आहे.
क्यूआर कोड
फोन पे, गुगल पे यांसारख्या यूपीआय पेमेंटसाठी वाहकाकडे असलेल्या ॲण्ड्राईड तिकीट मशीनवरील क्यूआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य होत आहे.

ऑनलाइन पेमेंटद्वारे किती मिळाली रक्कम
महिना     क्यूआर तिकीट     रक्कम
डिसेंबर २३     ६६०७८     १८१२३३०० 
जानेवारी     १०९४९५    ३१२८७१८७ 
फेब्रुवारी     १३३१५४    ४१०७०३८६ 
मार्च     २०५९६१     ५८६५०७८७ 
एकूण     ५१४६८८     ४९१३११६६०

Read in English

Web Title: Conductors can't operate Android machines, urge to buy tickets by paying cash in digital 'ST'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.