concessions after complaints from consumers, a circular was issued after the announcement of the energy minister | वीज ग्राहकांच्या तक्रारीनंतर पडला सवलतींचा पाऊस, ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेनंतर परिपत्रक जारी

वीज ग्राहकांच्या तक्रारीनंतर पडला सवलतींचा पाऊस, ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेनंतर परिपत्रक जारी

मुंबई : जून महिन्यात आलेल्या वीजबिलांनी ग्राहकांचे कंबरडे मोडले असतानाच, आता वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न महावितरणने केला आहे. घरगुती वीज ग्राहकांना बिलात प्रचलित १ टक्क्यांऐवजी २ टक्के सवलत मिळेल, अशी घोषणा ऊर्जा$मंत्री नितीन राऊत यांनी केली होती. त्यानुसार, आता यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

लॉकडाऊन काळात एप्रिल व मे महिन्यात ग्राहकांना मागील तीन महिन्यांतील म्हणजे म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीतील वीजवापरानुसार सरासरी बिले वितरित करण्यात आली. या कालावधीत ‘वर्क फ्रॉम होम’ व उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानामुळे अधिक वीजवापर झाल्याने घरगुती ग्राहकांच्या बिलात वाढ झालीे.

जून महिन्यात प्रत्यक्ष मीटर रीडिंगनुसार देण्यात आलेल्या बिलात यामुळे वाढ नोंदविण्यात आली. हेच ग्राहकांना विविध माध्यमांतून समजावून सांगितले जात आहे. मात्र, जास्त बिल आल्याने त्यांच्यात संताप आहे.

त्यानंतर, आता वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. ज्यांना एप्रिल, मे महिन्याचे वीजबिल सरासरी देण्यात आले आणि जून महिन्याचे बिल प्रत्यक्ष मीटर रीडिंगनुसार आले, अशा ग्राहकांनी त्यांचे संपूर्ण बिल थकबाकीसह मुदतीत भरल्यास त्यांना जूनच्या चालू वीजबिलाच्या रकमेच्या २ टक्के परतावा जुलैच्या बिलातून केला जाईल. ज्या घरगुती ग्राहकांचे एप्रिल, मे आणि जून महिन्याचे प्रत्येकी बिल सरासरी वापरानुसार दिले आणि त्यानंतर जुलै महिन्यातील बिल प्रत्यक्षात मीटर रीडिंगनुसार होईल, त्यांनी संपूर्ण बिल थकबाकीसह मुदतीत भरल्यास त्यांना जुलैच्या चालू बिलाची भरणा रक्कम २ टक्के सवलतीसह दर्शविली जाईल.

वाद असलेले ग्राहकही ठरणार पात्र
ज्या ग्राहकांचे बिलाचे वाद न्यायालयात, विविध मंचाकडे न्यायप्रविष्ठ आहेत, न्यायालयाने, मंचाने सदर रक्कम भरण्यास स्थगिती आदेश दिला आहे, अशा ग्राहकांनी वादातीत वीजबिल रक्कम वगळून बाकी वीजबिल संपूर्ण भरले असेल, तर तेदेखील सवलतीस पात्र असतील. त्यांची नोंद वादातीत रकमेसह बिलिंग प्रणालीत विनाविलंब करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

असे भरा हप्त्यांमध्ये वीजबिल
ज्या ग्राहकांना जूनचे वीजबिल तीन हप्त्यांमध्ये भरायचे आहे, त्यांना ते जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चालू बिलासहित भरता येईल. ज्यांना जुलैचे बिल तीन हप्त्यांमध्ये भरायचे असेल, त्यांना हे हप्ते जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चालू वीजबिलासह भरता येतील.

English summary :
concessions after complaints from consumers, a circular was issued after the announcement of the energy minister

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: concessions after complaints from consumers, a circular was issued after the announcement of the energy minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.