कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 11:50 IST2025-04-25T11:46:38+5:302025-04-25T11:50:47+5:30
Kunal Kamra Case: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत विडंबन सादर केल्याने काही दिवसांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात आता कुणाल कामरा याला मोठा धक्का बसला असून, मुंबई हायकोर्टाने त्याच्याविरोधात दाखल असलेले गुन्हे रद्द करण्यास नकार दिला आहे.

कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत विडंबन सादर केल्याने काही दिवसांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर कुणाल कामराविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात आता कुणाल कामरा याला मोठा धक्का बसला असून, मुंबई हायकोर्टाने त्याच्याविरोधात दाखल असलेले गुन्हे रद्द करण्यास नकार दिला आहे.
एकनाथ शिंदेंविरोधात विडंबन सादर केल्याने वाद झाल्यानंतर कुणाल कामरा याने मुंबई सोडून तामिळनाडूमध्ये आश्रय घेतला होता. दरम्यान, या प्रकरणी कुणाल कामराविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी कुणाल कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी कुणाल कामराविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास कोर्टाने नकार दिला.
दरम्यान, सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्यास असलेल्या कुणाल कामरा याची तामिळनाडूमधील चेन्नई येथे जाऊन चौकशी करण्याची परवानगी कोर्टाने मुंबई पोलिसांना दिली आहे. त्यानुसार आता चेन्नई येथे जाऊन पोलीस कुणाल कामरा याचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.