घरी बाप्पांच्या दर्शनाला या, भेटू... राज यांचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण, ठाकरे बंधू एकत्र साधणार गणेश दर्शनाचा योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 09:47 IST2025-08-25T09:45:47+5:302025-08-25T09:47:18+5:30

Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले बंधू आणि उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून घरच्या गणपतीच्या दर्शनाचे आमंत्रण दिले आहे.

Come to Bappa's house for darshan, we will meet... Raj invites Uddhav Thackeray, Thackeray brothers will have Ganesh darshan together | घरी बाप्पांच्या दर्शनाला या, भेटू... राज यांचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण, ठाकरे बंधू एकत्र साधणार गणेश दर्शनाचा योग

घरी बाप्पांच्या दर्शनाला या, भेटू... राज यांचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण, ठाकरे बंधू एकत्र साधणार गणेश दर्शनाचा योग

मुंबई  - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले बंधू आणि उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून घरच्या गणपतीच्या दर्शनाचे आमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला असून ते गणेश दर्शनासाठी पहिल्याच दिवशी सहकुटुंब 'शिवतीर्था'वर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित गणेश दर्शनाचा योग साधला जाणार असल्याची चर्चा आहे.

बंधूंमध्ये जवळीक वाढली
दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंमधील भेटीगाठी वाढल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ५ जुलै २०२५ रोजी एकाच मंचावर दिसले होते. यानंतर २७ जुलै २०२५ रोजी राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. 

Web Title: Come to Bappa's house for darshan, we will meet... Raj invites Uddhav Thackeray, Thackeray brothers will have Ganesh darshan together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.