पुढच्या वर्षी लवकर या ! राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 02:49 PM2017-09-05T14:49:08+5:302017-09-05T15:01:31+5:30

गेल्या 12 दिवसांत बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणरायाला ढोलताशांच्या गजराता बाप्पाला भाविक निरोप देत आहेत. राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Come on next year! The enthusiasm of Ganpati immersion across the state | पुढच्या वर्षी लवकर या ! राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह

पुढच्या वर्षी लवकर या ! राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह

Next

मुंबई, दि. 5 - गेल्या 12 दिवसांत बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणरायाला ढोलताशांच्या गजराता बाप्पाला भाविक निरोप देत आहेत. राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यासहीत राज्यभरामध्ये गणेश विसर्जनाचा उत्साह सकाळपासूनच दिसत आहे. 'मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया....पुढल्या वर्षी लवकर या', अशा जयघोषात बाप्पाला भाविक निरोप देत आहेत. कोल्हापूर, नाशिक, नगर, औरंगाबादमध्ये मानाच्या तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

भाईंदर 

धुळ्यात आरंभ ढोल ताशा पथकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतले

धुळे : हत्ती डोह परिसरात विसर्जनासाठी भाविकांची गर्दी 

पालघर : जव्हार पोलीस ठाण्याची गणेश विसर्जन मिरवणूक,  बाप्पाला वाजत-गाजत पोलिसांनी दिला निरोप.

 

दरम्यान, राज्यभरात विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गणेश विसर्जनासाठी नदी आणि तलावांमध्ये उतरणाऱ्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येईल. कोल्हापूर, सांगलीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे.   मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.  मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. कोल्हापूर, सांगलीमध्ये डॉल्बी लावणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.   

मुंबईत बेस्टच्या गाड्यांत कपात-
अनंत चतुर्दशीदिवशी मुंबई शहर व उपनगरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेस्ट मार्ग वळविण्यात येतात. या दिवशी बसगाड्यांमधून प्रवास करणाºया प्रवाशांची संख्याही
कमी असते. परिणामी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बसगाड्यांमध्ये कपात करण्यात येणार आहे. या दिवशी दुपारी २.३० नंतर एकूण ३४०७ बसगाड्यांपैकी १६८७ बसगाड्या सुरू राहणार आहेत.
विसर्जनादिवशी विशेष ८ लोकल फे-या-
गणरायाच्या विसर्जनानिमित्त मध्य रेल्वे ८ विशेष लोकल फेºया चालविण्यात येतील. मध्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण/ठाणे आणि कल्याण/ठाणे ते सीएसएमटी अशा प्रत्येकी २ लोकल चालविण्यात येतील. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी मार्गावर प्रत्येकी २ फे-या होणार आहेत.
अनंत चतुर्दशीच्या मध्यरात्री १.३० वाजता सुटणारी लोकल कल्याणला मध्यरात्री ३ वाजता पोहोचेल. दुसरी लोकल सीएसटीएमहून मध्यरात्री २.३० वाजता सुटेल. कल्याणहून मध्यरात्री १ वाजता सुटणारी लोकल सीएसएमटीला मध्यरात्री २.३० वाजता पोहोचणार आहे. ठाणे येथून २ वाजता सुटणारी लोकल सीएसटीएमला मध्यरात्री ३ वाजता पोहोचणार आहे.

 

Web Title: Come on next year! The enthusiasm of Ganpati immersion across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.