नामांकित महाविद्यालयांच्या कला, वाणिज्यच्या कटआॅफमध्ये किंचित घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 06:54 AM2019-08-15T06:54:41+5:302019-08-15T06:56:28+5:30

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली असून, यामध्ये एकूण ४८,६६४ विद्यार्थ्यांना प्रवेश उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Colleges cutoff list for FYJC News | नामांकित महाविद्यालयांच्या कला, वाणिज्यच्या कटआॅफमध्ये किंचित घसरण

नामांकित महाविद्यालयांच्या कला, वाणिज्यच्या कटआॅफमध्ये किंचित घसरण

Next

मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली असून, यामध्ये एकूण ४८,६६४ विद्यार्थ्यांना प्रवेश उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष फेरीसाठी १,२६,५६६ जागा होत्या. उपलब्ध जागांपैकी ५६,३७५ जागांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ४८,६६४ विद्यार्थ्यांना बुधवारी प्रवेश अलॉट करण्यात आले. विशेष फेरीच्या गुणवत्ता यादीत नामांकित महाविद्यालयांच्या कला व वाणिज्य शाखांच्या कटआॅफमध्ये किंचित घसरण दिसून आली. १६ आणि १९ आॅगस्टला विद्यार्थी प्रवेश निश्चित करू शकतील. त्यानंतर, विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ ही फेरी होईल.

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेचे ४,३०३, वाणिज्यचे ३१,८९७, विज्ञान शाखेचे ११,६७४ तर एमसीव्हीसी शाखेचे ७९० विद्यार्थी आहेत. या गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २८,५६८ आहे, तर दुसºया पसंतीचे महाविद्यालय ८,१९३ आणि तिसºया पसंतीचे महाविद्यालय ४,४४० विद्यार्थ्यांना मिळाले आहे. चौथ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले २,७३१ तर पाचव्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले १,८२० विद्यार्थी आहेत. विशेष गुणवत्ता यादीत प्रवेश अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण ९१.९७ टक्के विद्यार्थी राज्य मंडळाचे तर उर्वरित इतर मंडळाचे आहेत. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या ४४,७५७ आहे. इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये सीबीएसई मंडळाचे १,३६१, आयसीएसईचे १,३९४, आयबीचे ४, आयजीसीएसईचे २७१, एनआयओएसचे २४२, तर अन्य मंडळाचे ६३५ विद्यार्थी आहेत.

विज्ञान शाखेच्या कटआॅफमध्ये वाढ

मागच्या ३ फेऱ्यांमध्ये कटआॅफमध्ये दिसून आलेला चढउतार विशेष फेरीमध्येही कायम राहिला आहे. शहरातील मोजक्याच नामांकित महाविद्यालयांच्या कला व वाणिज्यच्या कटआॅफमध्ये किंचित घसरण दिसून आली. मात्र, रुईया, रूपारेल, साठ्ये, वझे केळकर, सेंट झेविअर्स, बिर्ला, भवन्स महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या कटआॅफमध्ये वाढ झाली. ही कटआॅफची वाढ तब्ब्ल ४ ते ८ टक्के आहे. रुईया, रूपारेल, साठ्ये, सेंट झेविअर्सच्या कला शाखेच्या कटआॅफमध्येही २ ते ३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

कोटा प्रवेशाच्या जागांवर प्रवेश
दुसºया गुणवत्ता यादीच्या समाप्तीपर्यंत इनहाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन या तीन कोट्यांच्या एकूण ४१,२०४ जागांवर प्रवेश झाल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाने दिली.
इनहाउस कोट्याचे ९,०२९, अल्पसंख्याक कोट्याचे २६,९८५, तर व्यवस्थापन कोट्याचे ५,१९० प्रवेश झाले आहेत. पहिल्या यादीत कोट्याचे ६१,६४५ प्रवेश निश्चित करण्यात आले होते.
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठीच्या विशेष फेरीसाठी एकूण १,२६,५६६ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. उपलब्ध करून देण्यात आलेल्या या जागांपैकी ५६,३७५ जागांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ४८,६६४ विद्यार्थ्यांना बुधवारी प्रवेश अलॉट करण्यात आले. आता या विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत म्हणजे १६ आणि १९ आॅगस्टला अकरावीसाठीचे प्रवेश निश्चित करायचे आहेत.

Web Title: Colleges cutoff list for FYJC News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.