कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ : पॅकेज ७ साठी तिसरे टीबीएम "वैनगंगा २" सारीपुत नगरात कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 16:24 IST2018-08-23T16:23:36+5:302018-08-23T16:24:04+5:30
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)च्या सातव्या पॅकेजमध्ये सारीपुत नगर येथे "वैनगंगा २"टनल बोअरिंग मशिन चा शुभारंभ झाला.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ : पॅकेज ७ साठी तिसरे टीबीएम "वैनगंगा २" सारीपुत नगरात कार्यरत
मुंबई - मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)च्या सातव्या पॅकेजमध्ये सारीपुत नगर येथे "वैनगंगा २"टनल बोअरिंग मशिन चा शुभारंभ झाला. याप्रसंगी आय ए एस अधिकारी व सीप्झ विभागाचे विकास आयुक्त बलदेव सिंग यांच्या हस्ते टीबीएम मशीन चे अनावरण झाले. या प्रसंगी इतर वरिष्ठ अधिकार्यांबरोबर एम एम आर सी च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे , एस.के. गुप्ता- डायरेक्टर प्रोजेक्ट , आर.रामन्ना- एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर(प्लॅनिंग) आय आय टी मुंबईच्या सिव्हिल विभागाचे प्राध्यापक एल्डो, प्राध्यापक दसाका मूर्ती आणि दिल्ली आय आय टी चे सिव्हिल विभागाचे प्राध्यापक वेंकट संतोष या सर्वांची उपस्थिती होती.
"वैनगंगा २" हे १०० मीटर लांब, ६६०० मिमी व्यासाचे असून सुमारे ५०० टन वजनाचे आहे. वैनगंगा २ हे शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी, चीनची निर्मिती आहे.'वैनगंगा २' सीप्झ मेट्रो स्थानकाच्या ०.५ किलोमीटर इतके भुयारीकरण करणार आहे.
यावेळी बोलताना एमएमआरसी च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या, "मुंबई मेट्रो ३चा पॅकेज सात हा शेवटचा टप्पा असून आज आम्ही एकूण सतरा टीबीएम मशीन पैकी बाराव्या मशीन चा शुभारंभ करत आहोत, ही आमच्या दृष्टीने महत्वाची घटना आहे.मुंबई मेट्रो ३ ला नेहमीच सहकार्य मुंबईकरांचे विशेष आभार. सीपझ चे विकास आयुक्त बलदेव सिंग आणि आय आय टी मुंबई व दिल्ली येथील प्राध्यापकांच्या विशेष उपस्थिती बद्दल त्यांचेदेखील आभार."
मुंबई मेट्रो ३च्या एकूण १७ टीबीएम मशीनपैकी १६ मशीन साईट्स वर दाखल झाल्या असून १४ मशीन्स भूगर्भामध्ये उतरविण्यात आल्या असून १२ कार्यरत झाल्या आहेत. एल अँड टी चे प्रकल्प संचालक ए. एच. खान आणि प्रकल्प व्यवस्थापक एच जयरामना हे उपस्थित होते त्याचप्रमाणे शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनीचे प्रतिनिधी चि चियाक यांग आणि शेन शेंगमिंग यांचीदेखील उपस्थिती होती.