coach reserved for mono-metro trains | मोनो, मेट्रोमध्ये डबेवाल्यांना हवाय आरक्षित डबा
मोनो, मेट्रोमध्ये डबेवाल्यांना हवाय आरक्षित डबा

मुंबई : दररोज मुंबईकरांची भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांना मेट्रोमधून प्रवास करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे प्रस्तावित नव्या मोनो आणि मेट्रोमध्ये डबेवाल्यांसाठी आरक्षित जागा अथवा एक डबा स्वतंत्र डबा ठेवावा अशी मागणी मुंबईच्या डबेवाल्यांच्या संघटनेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे.

मोनो आणि मेट्रो मार्गिकांमध्ये स्वतंत्र डबा ठेवण्याच्या मागणीचे निवेदन डबेवाला संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांच्याकडेही ते पाठवल्याचे संघटनेने सांगितले.


Web Title: coach reserved for mono-metro trains
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.