Join us

औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा, मुख्यमंत्र्याचे केंद्राला पत्र

By मोरेश्वर येरम | Updated: January 6, 2021 19:38 IST

औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महराज विमानतळ असे करण्याची अधिसूचना नागरी उड्डाण मंत्रालयाने लवकरात लवकर काढावी

मुंबईऔरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे पत्र केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना लिहील्याचं वृत्त 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महराज विमानतळ असे करण्याची अधिसूचना नागरी उड्डाण मंत्रालयाने लवकरात लवकर काढावी, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. 

औरंगाबादच्या नामांतरावरुन वादऔरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. शिवसेनेने औरंगाबादचे नामांतरण करुन संभाजीनगर करण्याची मागणी लावून धरली आहे. तर शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने यास विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरणाला विरोध असल्याचं स्पष्ट बोलून दाखवलं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याच्या विषयावर आमचा विश्वास नाही, असंही थोरात म्हणाले होते.  

टॅग्स :औरंगाबादउद्धव ठाकरेऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळमहाराष्ट्र