CM Uddhav Thackeray evaluates the work of the Shiv Sena MLA | शिवसेनेच्या आमदारांनी कामाचा लेखाजोखा सादर करा; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

शिवसेनेच्या आमदारांनी कामाचा लेखाजोखा सादर करा; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

मुंबई- गेले अनेक दिवस महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या संकटावर मात करण्याकरिता  मुख्यमंत्री उध्दव  ठाकरे आणि त्यांचे मंत्रीमंडळ सुनियोजित पद्धतीने उपाययोजना करीत आहेत. तसेच आपण शिवसेनेचे आमदार म्हणून आपल्या मतदार संघातील लोकांची कामे करत असून नागरिकांना सर्वोतोपरीने मदत करीत आहात. या कोरोनाच्या लढाईत आपण करीत असलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अवगत व्हावी, याकरिता आपल्या कामाचा लेखाजोखा येत्या दोन दिवसात सादर करण्याची विनंती शिवसेना विधीमंडळ पक्ष गटनेते एकनाथ शिंदे व शिवसेना विधीमंडळ पक्ष सुनिल प्रभू, मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी राज्यातील शिवसेनेच्या आमदारांना केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून नागरिकांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या शिवेसना आमदारांच्या कामाचा लेखाजोखा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करायचा आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार म्हणून आपण करीत असलेल्या कामाची माहिती (मतदार संघ व सदस्यांच्या नावसह) संक्षिप्तपणे माहिती shivsenabhavan@gmail.com  व shivsenavidhimandal98@gmail.com या
ई-मेल वर येत्या २ दिवसात पाठवावी अशी विनंती शेवटी एकनाथ शिंदे व सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या आमदारांना केली आहे.

Web Title: CM Uddhav Thackeray evaluates the work of the Shiv Sena MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.