'पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर'; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:29 PM2023-12-06T12:29:28+5:302023-12-06T12:48:02+5:30

जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असणार आहे. अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

CM Eknath Shinde promised that Mahaparinirvan Day will be held at Indu Mill Memorial next year | 'पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर'; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

'पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर'; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल रमेशबैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी उपस्थित असणाऱ्या लाखो अनुयायींना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं. 

पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर साजरा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असणार आहे. अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. डॉ. आंबेडकर यांचे भव्य असे स्मारक इंदू मिलच्या जागी उभारले जात असून हे काम वेळेत पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले.

 

डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं काम भारताच्या निर्मितीचे पहिलं पाऊल ठरलं आहे. त्यामुळेच आपण त्यांना महामानव म्हणतो, कारण जिथे लोकांचे विचार संपतात तिथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सुरू व्हायचे आणि म्हणूनच आज देशाच्या या वाटचालीमध्ये त्यांचा इतका मुलाचा वाटा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मला या गोष्टीचा समाधान आहे, ज्या वर्षी इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं अशा प्रकारची मागणी झाली होती, त्यावेळेस मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी पंतप्रधान मोदीजींना आम्ही विनंती केली आणि इंदू मिलची जागा आपल्याला मिळाली, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

Web Title: CM Eknath Shinde promised that Mahaparinirvan Day will be held at Indu Mill Memorial next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.