CM Eknath Shinde Birthday: आम्ही राजकीय शत्रू आहोत अन्...; संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 12:41 IST2023-02-09T12:41:31+5:302023-02-09T12:41:52+5:30
ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

CM Eknath Shinde Birthday: आम्ही राजकीय शत्रू आहोत अन्...; संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ५९ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. राज्यातील इतर राजकीय नेते देखील एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.
ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकरांनी त्यांना आज एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असल्याचं सांगितलं. यावर माझे सहकारी म्हणून तसेच एक व्यक्ती म्हणून वाढदिवसाला त्यांना आम्ही शुभेच्छा देतच असतो. आम्ही राजकीय शत्रू आहोत आणि शत्रू कायम राहणार, मात्र खाद्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, तर त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या.
एकनाथ शिंदे - अन्यायाविरुद्ध उठाव करणारे धाडसी मुख्यमंत्री..!
एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाचा वाढदिवस आहे. शिंदेंना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, या शुभकामना!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 9, 2023
आज सकाळी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेटून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या !@mieknathshindepic.twitter.com/f9tcxt2CF6
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात रात्री कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ठाण्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बँनर लागले आहेत. काही ठिकाणी बॅनरवर भेटला विठ्ठल असे लिहले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"