दहावीचे हॉलतिकीट ऑनलाइन मिळतेय; डाउनलोड केले का? परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 11:49 IST2025-01-25T11:49:39+5:302025-01-25T11:49:50+5:30
SSC Exam News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च २०२५ दरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट मंडळाच्या संकेतस्थळावर दि. २० जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दहावीचे हॉलतिकीट ऑनलाइन मिळतेय; डाउनलोड केले का? परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली
मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च २०२५ दरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट मंडळाच्या संकेतस्थळावर दि. २० जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इयत्ता दहावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. त्याकरिता शाळांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये.
या हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांची सही, शाळेचा शिक्का मारून ते विद्यार्थ्यांना द्यावे, असे आवाहन शिक्षण मंडळाने सर्व शाळांना केले आहे.
राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवरील केंद्रसंचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती अन्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमधून होणार आहे.
मात्र, या निर्णयास शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा विरोध होत आहे. हा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
४.२७ लाख विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज
१०६७ परीक्षा केंद्रे मुंबईतील विविध शाळांमध्ये निश्चित केली आहेत.