Join us  

राजगृहावर झालेल्या हल्ल्याची CID चौकशी करा, रामदास आठवलेंची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 9:10 PM

या हल्ल्याची CIDद्वारे चौकशी करावी या मागणीबाबतचे पत्र महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले आहे.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक पवित्र वास्तूवर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो असं म्हणत या हल्ल्याची CID  चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या माटुंगा येथील राजगृह या ऐतिहासिक पवित्र वास्तूवर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत.या हल्ल्याची CIDद्वारे चौकशी करावी या मागणीबाबतचे पत्र महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. या प्रकरणानंतर रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक पवित्र वास्तूवर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो असं म्हणत या हल्ल्याची CID  चौकशी करावी अशी मागणी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले आहे, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी केली आहे.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

राजगृहावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल, एकास घेतले ताब्यात 

 

खाकीला काळिमा! पोलीस अधिकारी महिलेचा पोलिसाकडून विनयभंग

टॅग्स :रामदास आठवलेमुंबईडॉ. बाबासाहेब आंबेडकरपोलिसअनिल देशमुखकेंद्रीय गुन्हे अन्वेषण