शिपायाकडून चिमुकलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 11:00 AM2022-05-26T11:00:15+5:302022-05-26T11:00:37+5:30

मुलुंडमधील घटना; नराधमाला पोलिसांकडून अटक

Chimukali tortured by peon, Naradhamala arrested by police | शिपायाकडून चिमुकलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक

शिपायाकडून चिमुकलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एका नामांकित शाळेच्या आवारात खेळणाऱ्या पाचवर्षीय चिमुकलीवर शाळेच्या शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मुलुंडमध्ये घडली. याप्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपी  शिपाई हेमंत वैती (५१) याला अटक केली आहे. 

मुलुंड पूर्वेकडील शाळेच्या आवारात पाचवर्षीय चिमुकली खेळत असताना, शाळेचा शिपाई वैती याची वाईट  नजर तिच्यावर पडली. उन्हाळी सुट्टी असल्यामुळे शाळेत कुणीही नसल्याचा फायदा घेत, वैतीने तिला शाळेच्या एका केबिनमध्ये नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच, याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने रडतच घर गाठले. आईने चौकशी करताच मुलीने घडलेला प्रकार सांगितला. 
या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी नवघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो, लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी वैतीला अटक केली आहे. 

विद्यार्थ्यांबाबतही चौकशी सुरू 
वैतीने शाळेतील  विद्यार्थिनींसोबतदेखील असभ्य    वर्तन केले आहे का? याबाबत   नवघर पोलीस तपास करत आहे.  वैती ३० वर्षांपासून शाळेत शिपाई म्हणून कार्यरत आहे. 
 

Web Title: Chimukali tortured by peon, Naradhamala arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.