जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार; मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 04:18 PM2021-12-08T16:18:17+5:302021-12-08T16:23:54+5:30

 गेल्या 12 तासात संपूर्ण जगात ओमायक्रॉनच्या रुग्णात 45 टक्के वाढ झाली असून 54 देशात याचा प्रसार झाला आहे.

Chief Minister Uddhav Thackeray instructed to complete vaccination in the state expeditiously against the backdrop of Omicron Variant | जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार; मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार; मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Next

मुंबई: ओमायक्रॉन विषाणुच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, मुला-मुलीचं वसतिगृह आणि इतर नवीन निवासी इमारती बांधण्यासाठी 95.15 कोटी रुपये आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत. आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडी सरकारने विविध निर्णय घेतले. 

महाराष्ट्राने सध्या 12 कोटीं 3 लाख 18 हजार 240 डोसेस दिले असून 4 कोटी 37 लाख 46 हजार 512 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.  7 कोटी 65 लाख 71 हजार 728 लोकांनी एक डोस घेतला आहे.  18 ते 44 वयोगटात 76.69 लोकांनी कमीत कमी 1 डोस तर 45 पेक्षा अधिक वयोगटातील 85.25 टक्के लोकांनी एक डोस घेतलेला आहे.

 गेल्या 12 तासात संपूर्ण जगात ओमायक्रॉनच्या रुग्णात 45 टक्के वाढ झाली असून 54 देशात याचा प्रसार झाला आहे.  फ्रान्समध्ये दैनंदिन रुग्ण 40 हजारच्या पुढे आढळत असून जर्मनीत ही संख्या 50 हजाराच्या आसपास आहे.  ऑस्ट्रीयामध्ये देखील कोविड सुरु झाल्यापासून सगळ्यात मोठी लाट आली असून दररोज 7 हजारच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत. 

अमेरिकेत देखील नोव्हेंबर 2020 सारखी परिस्थिती उद्भवली असून दररोज एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत.  दक्षिण आफ्रिकेत गेल्या 2 आठवड्यात नवीन रुग्णात मोठी वाढ झाली असून दररोज दुपटीने रुग्ण आढळत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील काळजी घेण्याची गरज असून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळले गेलेच पाहिजे यावर भर देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray instructed to complete vaccination in the state expeditiously against the backdrop of Omicron Variant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.