मुख्यमंत्र्यांनी केले राज्यातील पोलिसांचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 02:08 IST2021-01-02T02:08:36+5:302021-01-02T02:08:48+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य पोलिसांची प्रशंसा केली आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी केले राज्यातील पोलिसांचे कौतुक
मुंबई : महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही. पोलिसांच्या सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ कर्तृत्वावर कुणीही डाग लावू शकत नाही. असेच कर्तृत्व येणाऱ्या वर्षभर नव्हे, तर पुढील कित्येक वर्षे गाजवत राहा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य पोलिसांची प्रशंसा केली आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या.
ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कोविड योद्धे, तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कुणी कितीही प्रयत्न केले, तरीही मुंबई असो किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या स्वच्छ कर्तृत्वावर डाग लावू शकत नाही. , असे मुख्यमंत्री म्हणाले. ठाकरे यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच उत्कृष्ट तपास आणि गुन्ह्यांची उकल करून, तातडीने मुद्देमाल संबंधितांना परत करणाऱ्या पोलिसांचाही सन्मान करण्यात आला.