मुंबई - राज्यातील कोरोवा रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सत्ताधारी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. सरकारचे निर्णय कागदावरच राहिले असून, राज्य कोरोनाचा हॉटस्पॉट बनलंय. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री केवळ मुंबईवर आणि उपमुख्यमंत्री पुण्यावर लक्ष देताहेत बाकी शहरांचं काय, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या फैलावाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. तसेच कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियोजनावरही फडणवीस यांनी टीका केली. कोरोनाबाबत राज्य सरकार गंभीर नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील परिस्थितीवर लक्ष द्यायचं आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यातील परिस्थितीवर लक्ष द्यायचं. मग बाकीच्या शहरांचं काय. नागपूर, औंरंगाबाद, नाशिक या शहरांचं काय. या शहरांमध्ये आढावा बैठका कधी घेणार. अनेक महानगरपालिकांना सरकारकडून मदत मिळालेली नाही. नागपूर, औरंगाबाद आणि इतर शहरे ही काय महाराष्ट्राबाहेर आहेत का की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र हा मुंबई पुण्यापुरताच मर्यादित आहे का? असा सवाल फडणवीस यांनी केला.
Coronavirus : मुख्यमंत्री मुंबईत, उपमुख्यमंत्री पुण्यात; बाकीच्या शहरांच काय? कोरोनावरून फडणवीसांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 16:43 IST
मुख्यमंत्री केवळ मुंबईवर आणि उपमुख्यमंत्री पुण्यावर लक्ष देताहेत बाकी शहरांचं काय, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Coronavirus : मुख्यमंत्री मुंबईत, उपमुख्यमंत्री पुण्यात; बाकीच्या शहरांच काय? कोरोनावरून फडणवीसांचा घणाघात
ठळक मुद्देराज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलावसरकारचे निर्णय कागदावरच राहिले असून, राज्य कोरोनाचा हॉटस्पॉट बनलंयअनेक महानगरपालिकांना सरकारकडून मदत मिळालेली नाही