छावा संघटनेचा मंत्रालयावर मोर्चा, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 03:55 PM2018-09-24T15:55:13+5:302018-09-24T15:56:14+5:30

छावा मराठा युवा महासंघाने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव न देणाऱ्या व्यापारी

Chhava Sanghatan's ministry, the police arrested the protesters | छावा संघटनेचा मंत्रालयावर मोर्चा, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात

छावा संघटनेचा मंत्रालयावर मोर्चा, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात

Next

मुंबई - छावा मराठा युवा महासंघाने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव न देणाऱ्या व्यापारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे. आंदोलकांनी मोठ-मोठ्याने सरकारविरोधी घोषणा दिल्या. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल आहे. 

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतील संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. 

* आंदोलकांच्या मागण्या

१) शेतकऱ्यांचा शेतमाल निर्धारित केलेल्या हमीभावानेच खरेदी करावा
२) शेतमालाच्या हमीभावा संदर्भात २१ ऑगस्ट २०१८ रोजी करण्यात आलेला हमीभाव न देणाऱ्या व्यापारी तसेच बाजारसमितीवरील शिक्षेच्या तरतुदीची कठोर अंमलबजावणी करावी. ( ५०,००० रु. दंड व एक वर्ष कारावास व परवाना रद्द ) संबंधितांवर त्वरित गुन्हे दाखल करावे.
३) सरकारने वेळीच जास्तीत जास्त शासकीय खरेदी केंद्र चालू करावेत व शेतकऱ्यांच्या शेवटच्या दाण्यापर्यंत शेतमाल खरेदी करावा.
४) शेतमाल खरेदी केल्यास त्वरित त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोनच दिवसात जमा करावी. त्याची पूर्ण व्यवस्था करावी.
५) २०१७-१८ मधील खरेदी केलेल्या तूर, हरभरा पिकाचे पेमेंट अद्यापपर्यंत जमा झाले नाही. ते त्वरित जमा करावे.
६) महाराष्ट्रात काही ठिकाणी ( मराठवाड्यात ) पर्जन्यमान कमी असल्याने शेतकऱ्यांचे उभे पीक करपून गेले. त्यांचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी.

मुंबईमंत्रालयावर छावा मराठा युवा महासंघातर्फे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी, आंदोलक कार्यकर्त्यांना मरीन लाइन्स पोलिस ठाण्याला नेण्यात आले आहे. 
 

Web Title: Chhava Sanghatan's ministry, the police arrested the protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.