Mumbai Building Accident: मुंबईतीलचेंबूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. चेंबूरच्या सुभाष नगर भागात एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना सहाव्या मजल्यावरून सहा कामगार अचानक खाली कोसळले. यातील एका कामगाराचा मृत्यू झाला असून, या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुभाष नगर येथील एका उच्चभ्रू इमारतीचे बांधकाम वेगात सुरू होते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामगार सहाव्या मजल्यावर स्लॅब किंवा प्लास्टरचे काम करत होते. मात्र, सकाळी काम सुरू असतानाच अचानक या सहाही कामगारांचा तोल गेला आणि ते थेट ८० ते ९० फूट उंचीवरून खाली कोसळले.
सुरक्षा नियमांचा पुरता फज्जा!
या अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सहव्या मजल्यासारख्या उंचावर काम करत असताना एकाही कामगाराने 'सेफ्टी किट' वापरले नव्हते. नियमानुसार, उंच इमारतीवर काम करताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आणि नेट असणे अनिवार्य आहे. मात्र, या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. जर या कामगारांनी सेफ्टी बेल्ट लावले असते, तर कदाचित आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, अशी चर्चा घटनास्थळी सुरू आहे.
राजावाडी रुग्णालयात मृत्यूशी झुंज
अपघात होताच बांधकामस्थळी असलेल्या इतर सहकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सहाही कामगारांना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी काही कामगारांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे.
Web Summary : Six workers fell from the eighth floor of a Chembur construction site due to alleged safety negligence. Critically injured, they are battling for their lives in Rajawadi Hospital. Police are investigating potential safety violations.
Web Summary : चेंबूर में एक निर्माणाधीन इमारत से सुरक्षा चूक के कारण छह मजदूर आठवीं मंजिल से गिर गए। गंभीर रूप से घायल मजदूरों को राजावाड़ी अस्पताल में भर्ती कराया गया है। पुलिस सुरक्षा उल्लंघनों की जांच कर रही है।