विनयभंगप्रकरणी गणेश आचार्यविरोधात न्यायालयात आरोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 07:49 AM2022-04-01T07:49:05+5:302022-04-01T07:49:30+5:30

आचार्य हा २००९ ते २०१० पर्यंत शरीरसंबंध ठेवण्यास सांगत पॉर्न व्हिडीओ पाहण्याची सक्ती करीत असल्याचा पीडितेचा आरोप आहे

Chargesheet against Ganesh Acharya in molestation case | विनयभंगप्रकरणी गणेश आचार्यविरोधात न्यायालयात आरोपपत्र

विनयभंगप्रकरणी गणेश आचार्यविरोधात न्यायालयात आरोपपत्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात ओशिवरा पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आले. गणेश आचार्यविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात फेब्रुवारी, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.

आचार्य हा २००९ ते २०१० पर्यंत शरीरसंबंध ठेवण्यास सांगत पॉर्न व्हिडीओ पाहण्याची सक्ती करीत असल्याचा पीडितेचा आरोप आहे.  याबाबत ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांना फोन केला तेव्हा ‘मी सुटीवर असून, मला काहीच माहीत नाही’, असे त्यांनी सांगितले. तर तपास अधिकारी संदीप शिंदे यांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय माहिती मी देऊ शकत नाही, त्यांनी मला सांगितल्यास मी माहिती देईन, असे उत्तर दिले. शिंदे आपला फोन उचलत नसल्याचा आरोप पीडितेने ‘लोकमत’शी बोलताना केला, तर तिला सर्व माहिती पुरविण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Chargesheet against Ganesh Acharya in molestation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.