Join us

चकवा : परतीच्या मान्सूनला मुंबईत लेटमार्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 15:48 IST

Mumbai Monsoon : ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यात परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

मुंबई : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून ८ ऑक्टोबर रोजी मुंबईतून आणि ११ ऑक्टोबर रोजी पुण्यातून माघार घेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही शहरांतून मान्सूनच्या परतीचा प्रवास यापेक्षाही विलंबाने सुर होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर नागपूरमधून मान्सून ६ ऑक्टोबरला परतीचा प्रवास सुरु करेल, असा अंदाज आहे. मात्र येथेही मान्सून चकवा देणार असून, परतीच्या पावसाला येथे ३ ते ४ दिवसांचा लेटमार्क होईल.चार महिने झोडपून काढलेल्या पावसाने ऋतू महिन्यानुसार ३० सप्टेंबर रोजी आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे. असे असले तरी राजस्थानतून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून अद्याप तरी महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यात परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर परतीचा मान्सूनचा प्रवास मुंबईतून देखील सुरु होईल. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, महाराष्ट्रात मान्सूनची समाधानकारक नोंद झाली आहे. विभागावार पावसाचा विचार करता मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. एकंदर सर्वदूर चांगला पाऊस झाला असून, राज्यातल्या बळीराजासाठी यंदाच्या मान्सूनने पुरेपुर पाऊस पाणी दिले आहे. ------------------केव्हा कुठे दाखल झाला मान्सून- १७ मे अंदमान- १ जून केरळ- १४ जुन मुंबईसह महाराष्ट्र- २६ जून संपूर्ण देश------------------

टॅग्स :मानसून स्पेशलपाऊसमुंबई मान्सून अपडेटमहाराष्ट्र