महिलेवर अत्याचार करणाऱ्याला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 05:47 IST2019-01-28T05:47:25+5:302019-01-28T05:47:49+5:30

मोदींचा निकटवर्तीय भासवून अनेकांची फसवणूक

Chained to the woman who abused the woman | महिलेवर अत्याचार करणाऱ्याला बेड्या

महिलेवर अत्याचार करणाऱ्याला बेड्या

मुंबई : महिलेला लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार करणाºयाला गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने गुरुवारी गुजरातमधून अटक केली. तो अभिलेखावरील गुन्हेगार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निकटवर्तीय असल्याचे भासवून त्याने अनेकांकडून पैसे उकळले आहेत. शुक्रवारी त्याला मालवणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

भूपेंद्र जयंतकुमार व्यास (५५) असे आरोपीचे नाव आहे. लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार एका महिलेने ९ जानेवारी रोजी मालवणी पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार मालवणी पोलीस आणि गुन्हे शाखेने त्याचा समांतर तपास सुरू केला. तो सतत ठिकाण बदल असल्याने त्याचा माग काढणे कठीण होते.

तो गुजरातच्या वडोदरा परिसरात असल्याची माहिती सूत्रांकडून गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद घाग आणि त्यांचे पथक वडोदºयात दाखल झाले. वडोदºयात तो एका भाड्याच्या खोलीत राहायचा. गुरुवारी रात्री सापळा लावून त्याला अटक केली. शुक्रवारी त्याला मालवणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मोदींसोबत फोटो
व्यास हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, गुजरात तसेच अन्य शहरांतदेखील त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निकटवर्तीय असल्याचे भासवत त्याने अनेकांकडून पैसे उकळले आहेत. मोदी यांच्यासोबत पोलीस उपमहासंचालकाच्या गणवेशात त्याने मॉर्फ फोटोदेखील तयार केले होते. त्यानुसार गुजरात पोलीसदेखील त्याच्या मागावर होते.

Web Title: Chained to the woman who abused the woman