मध्य, पश्चिम रेल्वेच्या ३३ एक्स्प्रेस रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 07:09 AM2020-03-18T07:09:08+5:302020-03-18T07:10:13+5:30

कोरोनामुळे प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने १० गाड्यांच्या ३५ फेऱ्या रद्द केल्या आहेत.

Central, Western Railway's 33 Express canceled | मध्य, पश्चिम रेल्वेच्या ३३ एक्स्प्रेस रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मध्य, पश्चिम रेल्वेच्या ३३ एक्स्प्रेस रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Next

मुंबई : मुंबईत गर्दी टाळण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेने १८ मार्चपासून ते १ एप्रिलपर्यंत एकूण ३३ एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने रद्द केलेल्या गाड्यांमध्ये मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, एलटीटी अंजनी एक्स्प्रेस, एलटीटी-निझामाबाद एक्स्प्रेस, नागपूर-रेवा एक्स्प्रेस, नंदिग्राम एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, पुणे-अजनी एक्स्प्रेस, एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस, भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस, करबुर्गी-सिकंदराबाद एक्स्प्रेस, हावडा-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, सीएसएमटी-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे.
कोरोनामुळे प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने १० गाड्यांच्या ३५ फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामध्ये मुंबई सेंट्रल-इंदूर दुरांतो एक्स्प्रेस, इंदूर-मुंबई सेंट्रल दुरांतो एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस-जामनगर हमसफर एक्स्प्रेस, जामनगर-वांद्रे टर्मिनस हमसफर एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-जयपूर दुरांतो एक्स्प्रेस, जयपूर-मुंबई सेंट्रल दुरांतो एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली दुरांतो एक्स्प्रेस, नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल दुरांतो एक्स्प्रेस, इंदूर-पुरी हमसफर एक्स्प्रेस, पुरी-इंदूर हमसफर एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ५० रुपये

रेल्वे स्थानकावरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ केली आहे. त्यानुसार, सुरत येथे १० रुपये असलेले प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले आहे. तर वांद्रे टर्मिनस, बोरीवली, मुंबई सेंट्रल ४० रुपये, दादर, अंधेरी, वसई रोड, बोईसर, नंदुरबार ३० रुपये, अमळनेर, विरार, पालघर, वांद्रे, भार्इंदर, डहाणू रोड, गोरेगाव, नालासोपारा, दोंडाईचा, चर्चगेट, मालाडसाठी २० रुपये आणि पश्चिम रेल्वेच्या उर्वरित मुंबई विभागासाठी १५ रुपये असतील.

Web Title: Central, Western Railway's 33 Express canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.