Join us  

"कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार, बंदी तात्काळ उठवावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 1:40 PM

केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे ती तात्काळ उठवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

मुंबई - कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे ती तात्काळ उठवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये (हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणूकाआधी) घातलेली निर्यात बंदी आता मार्चमध्ये उठवली होती. त्यानंतर बरोबर सहा महिन्यात पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. हे भाजप सरकार शेतकर्‍यांना परावलंबी ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

शेतकर्‍यांनी ६० टक्के साठवलेला कांदा आधीच खराब झाला आहे आणि आता भाजप सरकारने निर्यात बंदी घातल्यामुळे शेतकर्‍यांना कांदा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ येणार आहे. केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे असेही महेश तपासे म्हणाले.

कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी!, केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. संबंधित निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयावर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. बंगळुरू रोझ व कृष्णापुरम या जाती वगळून सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनायाने बंदी घातली आहे. कांदा पावडरला या निर्यातबंदीतून वगळण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात वाढ होत आहे. तर यंदा दक्षिणेत खरीप कांद्याचे पावसाने नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातही खरीप कांद्याच्या लागवडीला फटका बसला आहे. मात्र निर्यातबंदी करताना सरकारने कोणतेही कारण दिलेले नाही. सरकारने त्याचा खुलासा करावा, अशी मागणी नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी केली आहे. सध्याची भाववाढ ही निर्यातीमुळे आहे की मालाचा पुरवठा कमी असल्याने झाली आहे, याचीही आकडेवारी उपलब्ध नाही. कांद्याला आता कुठे भाव मिळत असताना अचानक निर्यातबंदी लादल्याने शेतकºयावर अन्याय झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"

डेटिंग वेबसाईट्सद्वारे मोठा 'गेम', हॅकर्सनी चोरला लाखो युजर्सचा डेटा

CoronaVirus News : बापरे! कोरोना लसींच्या चाचण्यांची माहिती लपवताहेत कंपन्या, शास्त्रज्ञांनी केलं अलर्ट

तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'ही' ई-कॉमर्स कंपनी देणार तब्बल एक लाख लोकांना नोकरी 

जय जिजाऊ, जय शिवराय! योगी सरकारच्या 'त्या' निर्णयावर फडणवीसांचं खास ट्विट, म्हणाले...

टॅग्स :कांदाशेतकरीनरेंद्र मोदीसरकारराष्ट्रवादी काँग्रेस