Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 21:38 IST2025-05-13T21:36:44+5:302025-05-13T21:38:01+5:30

Mumbai News: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी नागरिकांना दिला.

Case Against Mumbai Man For Using Drone Without Permission: Cops | Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड

Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड

मुंबईतील ताज हॉटेलजवळ परवानगीशिवाय ड्रोन उडवणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला पोलिसांना चांगलाच धडा शिकवला. अरमल्ला जेसी इसहाक अब्राहम लिंकन असे या तरुणाचे नाव असून तो आंध्र प्रदेशातील हैदराबादचा रहिवासी आहे. संवेदनशील क्षेत्रांमध्ये परवानगीशिवाय ड्रोन उडवू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी नागरिकांना दिला.

मुंबई पोलिस आयुक्तालयाने भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत ५ मे ते ३ जून २०२५ पर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर, मायक्रोलाईट विमाने आणि हँड ग्लायडर उडवण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. मात्र, तरीही ताज हॉटेलजवळ मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास पोलिसांना ताज हॉटेलच्या वर आकाशात एक संशयास्पद उडणारी वस्तू दिसली. पोलिसांनी तपास केल्यानंत असे समजले की, गेटवे ऑफ इंडियाजवळील जेट्टी क्रमांक ०५ जवळ उभ्या असलेल्या कारमधून हे ड्रोन उडवले जात आहे, ज्यात लिंकन बसला होता. 

पोलिसांनी तरुणाची चौकशी केली असता तो ड्रोन त्याचाच असल्याची त्याने कबूली दिली. ड्रोन उडवण्यासाठी त्याने कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती. पोलिसांनी त्याच्याजवळील ७० हजार रुपये किंमताचा ड्रोन आणि त्याचा रिमोट कंट्रोलर जप्त केला. मात्र, पोलिसांनी तरुणाला अटक केली नाही. त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. संवेदनशील क्षेत्रात परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याने धोका निर्माण होऊ शकतो, याची नागरिकांनी काळजी घ्यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला. 

Web Title: Case Against Mumbai Man For Using Drone Without Permission: Cops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.