मुलीने ‘जस्ट फ्रेण्ड’ म्हटले, दहावीतील त्याने आत्महत्या केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 11:09 IST2022-09-18T11:09:10+5:302022-09-18T11:09:58+5:30

२२व्या मजल्यावरून तरुणाने मारली उडी

Called 'just friend', he committed suicide in mumbai | मुलीने ‘जस्ट फ्रेण्ड’ म्हटले, दहावीतील त्याने आत्महत्या केली

मुलीने ‘जस्ट फ्रेण्ड’ म्हटले, दहावीतील त्याने आत्महत्या केली

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने तो राहत असलेल्या उच्चभ्रू इमारतीच्या २२व्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपविले. त्याचे एकतर्फी प्रेम असलेल्या मुलीने त्याला ‘जस्ट फ्रेण्ड’ म्हटल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात असून ओशिवरा पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात असलेल्या समर्थ आंगन या इमारतीत १ए/५०३/५०४ मध्ये मयत मुलगा त्याची आई, बहीण आणि वडिलांसोबत राहत होता. इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने शुक्रवारी रात्री इमारतीच्या बाविसाव्या मजल्यावरील अग्निशमन दलाच्या डक परिसरातून थेट खाली उडी मारली. उडी मारण्याच्या काही मिनीट आधी त्याने बहीण, मित्र आणि आईवडिलांना शेवटचा मेसेज केला. जो पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. त्याच इमारतीमध्ये राहणारा त्याचा मित्र बाहेर येईपर्यंत सर्व काही संपले होते. त्याच्या आई आणि बहिणीने त्याला कोकिलाबेन रुग्णालयात हलविले. तिथे त्याला मयत घोषित करण्यात आले आणि मृतदेह शविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिसांना त्याच्या खोलीत एक डायरी सापडली आहे. ज्यात त्याने त्याच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्याच्या ग्रुपमध्ये कॉमन फ्रेंड असलेल्या मुलीवर त्याचे प्रेम होते. त्यानुसार त्याने तिला विचारणा केली, मात्र तिने थेट नकार देत तू माझा फक्त मित्र आहेस अजून काही नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे तो बराच निराश झाला होता. त्यातूनच हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Web Title: Called 'just friend', he committed suicide in mumbai