Join us  

... पण मी मुख्यमंत्र्यांना एक सेकंदही बघितलं नाही; आव्हाडांचं असंही स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 9:04 PM

जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर गेले होते.

मुंबई - मला कुठल्याही क्षणी कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल असं काही केंद्रातील अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. निदान ठाणे महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरला आहे. माझ्याविरोधात काही केसेस नाही. परंतु ही जेव्हा बातमी येते जेव्हा आश्चर्य वाटतेच असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या दाव्यानंतर काही वेळातच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट झालीच नसल्याचे स्पष्टीकरणही दिले आहे. तसेच, मी सह्याद्री अतिथीगृहावर गेलो होतो, असेही त्यांनी म्हटले. 

जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर गेले होते. तत्पूर्वी, त्यांनी मीडियाशी संवाद साधला. हिंदू जनआक्रोश मोर्चे निघतायेत. तुम्हाला विधेयक आणण्यापासून कुणी रोखलंय? बेटी बेटी के तुकडे कर देंगे हे माझ्याच बहिणीला धमकी देतायेत. हिंदू धर्मातील मुलींनाच धमक्या देतायेत. ही कुठली पद्धत झाली असं त्यांनी म्हटले होते. जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट होत असल्याची चर्चा रंगली असतानाच, आता आव्हाड यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे. 

''कृपया अफवा पसरवू नका. मी सह्याद्रीवर गेलो होतो पण मुख्यमंत्र्यांना एक सेकंद बघितले नाही व भेटलो नाही. त्याप्रकारे बाईट देखिल मी सर्व वृत्तवाहिन्यांवर दिली आहे. उगाच गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या देऊ नका. माझे हे स्पष्टीकरण'' असल्याचेही आव्हाड यांनी म्हटले. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडएकनाथ शिंदेमुख्यमंत्रीराष्ट्रवादी काँग्रेस