Join us

बसचालक मोरेचे अपघातानंतर बदलले कपडे; ‘तो’ ढसाढसा रडत होता, वकिलाने सांगितला प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 06:39 IST

कुर्ला स्थानकातून सुटलेली बस भरधाव वेगाने जात होती. गाड्यांना उडवत होती, पादचाऱ्यांना उडवत होती. अखेर बस एका सोसायटीच्या भिंतीवर जाऊन आदळली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कुर्ला स्थानकातून सुटलेली बस भरधाव वेगाने जात होती. गाड्यांना उडवत होती, पादचाऱ्यांना उडवत होती. अखेर बस एका सोसायटीच्या भिंतीवर जाऊन आदळली. यावेळी संतप्त जमावाने बसचालकाला बाहेर काढले आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली.

क्षणार्धात मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला. काय घडतंय हे बघण्यासाठी गेलो असता एका बसचालकाला जमावातील काही लोक मारहाण करत होते. तो लाथाबुक्क्या खात होता. मी कसलाही विचार न करता त्याच्या अंगावर झेप घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी संतप्त जमावाचा रोष मला सहन करावा लागला. परंतु त्याला कसंबसं वाचवत पोलिसांच्या व्हॅनपर्यंत पोहोचवले, असे बसचालक संतोष मोरेला वाचविणाऱ्या ॲड. असिफने  हुसेन यांनी सांगितले. 

अपघातानंतर बसचालक मोरे अस्वस्थ आणि खूप घाबरलेला होता. संतोषने मला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला. त्याला काहीच सुचत नव्हते. अखेर  त्याला जमावातून बाहेर काढत पोलिसांकडे सुपुर्द केले. तसेच एका दाताच्या दवाखान्यात बसचा वाहक बसला होता. मी तेथे गेलो आणि त्याचे कपडे बदलून तिथून त्याला बाहेर काढले, असा घटनाक्रम ॲड. आसिफ हुसेन यांनी कथन केला.

टॅग्स :कुर्लाबेस्टअपघात