पवईत विद्यार्थ्याला दिली बैलाने धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 14:30 IST2019-07-12T14:26:05+5:302019-07-12T14:30:24+5:30
झुंज सुरू असताना धावणाऱ्या एका बैलाने अक्षयला जोरदार धडक दिली.

पवईत विद्यार्थ्याला दिली बैलाने धडक
ठळक मुद्देजखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी विक्रोळी येथील शुश्रूषा रुग्णालयात दाखल केलेजखमी विद्यार्थ्याचं नाव अक्षय लथा असर हे आहे.
मुंबई - पवई येथील आयआयटी गेट क्रमांक 9 समोर आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला बैलाने धडक दिली. जखमी विद्यार्थ्याचं नाव अक्षय लथा असर हे आहे. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी विक्रोळी येथील शुश्रूषा रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोन बैलांमध्ये झुंज सुरू असताना धावणाऱ्या एका बैलाने अक्षयला जोरदार धडक दिली. त्यानंतर जमलेल्या लोकांनी अक्षयला मदत करून उठविले.
पवईत आयआयटी गेट क्रमांक ९ समोर विद्यार्थ्याला दिली बैलाने धडक https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 12, 2019