Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील पूल कोसळला; 4 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 07:47 PM2019-03-14T19:47:06+5:302019-03-14T19:49:10+5:30

काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

The bridge near the CSMT railway station collapsed | Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील पूल कोसळला; 4 जणांचा मृत्यू 

Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील पूल कोसळला; 4 जणांचा मृत्यू 

googlenewsNext
ठळक मुद्देपुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे.घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. 7.30 च्या आसपास ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)  रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारा आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच फोर्टकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत.  घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत. 

सीएसएमटी परिसरात बरीच कार्यालये असून चाकरमानी घरी जाण्याच्या वेळेस म्हणजेच वर्दळीच्या वेळी ही दुर्घटना घडली आहे. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर ही गंभीर घटना घडली आहे. 10 ते 12 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेत दोन महिलांसह तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि झाहीद सिराज खान अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. 

कामा रुग्णालयातून सीएसएमटीकडे येणारा दरवाजा बंद करण्यात आला आहे. 7.30 च्या आसपास ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. जखमींना सायन, सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या पुलाजवळ अंजुमन इस्लाम ही शाळा असून अनेकजण कार्यालयात आणि रेल्वे स्थानकाकडे जाण्या - येण्यासाठी या पुलाचा वापर केला जातो.  




 

Web Title: The bridge near the CSMT railway station collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.