BREAKING: मुंबईत कांदिवलीतील इमारतीत भीषण आग, अग्निशमन दल दाखल; महापौरही पोहोचल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 21:58 IST2021-11-06T21:57:32+5:302021-11-06T21:58:31+5:30

मुंबईतील कांदिवली येथे हवासा हेरिटेज नावाच्या १५ मजल्याच्या इमारतीत १४ व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत

breaking mumbai kandivali fire Hawsa Heritage building | BREAKING: मुंबईत कांदिवलीतील इमारतीत भीषण आग, अग्निशमन दल दाखल; महापौरही पोहोचल्या

BREAKING: मुंबईत कांदिवलीतील इमारतीत भीषण आग, अग्निशमन दल दाखल; महापौरही पोहोचल्या

मुंबई-

मुंबईतील कांदिवली येथे हवासा हेरिटेज नावाच्या १५ मजल्याच्या इमारतीत १४ व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री साडेआठ वाजता आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 

कांदिवली पश्चिमेकडील मथुरादास मार्गावरील हंसा हेरिटेज नावाच्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. इमारत एकूण १५ मजल्यांची आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील आगीची माहिती मिळताच तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या आहेत. इमारतीच्या संपूर्ण १४ व्या मजल्यावर आग पसरली असून ५ जण अडकल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. 

Web Title: breaking mumbai kandivali fire Hawsa Heritage building