मुख्यमंत्री बंगल्याचे पाणी तोडा, येऊ दे आंघोळीविना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 06:26 IST2019-06-26T06:25:44+5:302019-06-26T06:26:22+5:30
मुख्यमंत्री अन् मंत्र्यांच्या बंगल्यांची पाणीपट्टी थकविली जात असेल तर आपण पाणीपट्टी प्रामाणिकपणे का भरावी असा प्रश्न सामान्यांना साहजिकच पडेल.

मुख्यमंत्री बंगल्याचे पाणी तोडा, येऊ दे आंघोळीविना
मुंबई : मुख्यमंत्री अन् मंत्र्यांच्या बंगल्यांची पाणीपट्टी थकविली जात असेल तर आपण पाणीपट्टी प्रामाणिकपणे का भरावी असा प्रश्न सामान्यांना साहजिकच पडेल. थकबाकी ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अन् मंत्र्यांच्या बंगल्यांचे पाणी तोडा अन् त्यांना येऊ देत विना आंघोळीचे’ या शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत बोचरी टीका केली.
यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले, की बिले भरली गेली नाहीत या आरोपात कोणतेही तथ्य नाही. ती नियमित भरली जात होती.भरली गेलेली बिले पुन्हा आकारणीसाठी आली.त्यामुळे महापालिकेला पत्र लिहून ते निदर्शनास आणून देण्यात आले.तेव्हा पुन्हा रक्कम दुरूस्ती करून नवीन बिले पाठविण्यात आली. सरकारी कार्यपदधतीनुसार यात महिना दीड महिना गेला.
आमच्याकडे उपसचिव, सचिव आदी चार जणांच्या सहया होउन ते पत्र गेले. महापालिकेत पण तेच झाले. या मधल्या काळातील माहिती सिलेक्टीव्हली माहिती अधिकारात काढली गेली.माध्यमांनी देखील तशा बातम्या दाखविल्या.बिले थकविली यात कोणतेही तथ्य नाही.त्यामुळे आम्हाला रोज आंघोळ करू द्या, आम्ही आंघोळ करूनच येणार असे मुख्यमंत्र्यांची म्हणताच सभागृहात हशा पिकला.
तत्पूर्वी, शून्य प्रहरात हा मुंबईत कोटयवधी लोक राहतात.त्यांनी जर पाणीपटटी भरली नाही तर
त्यांची कनेक्शन लगेचच कापली जातात.
राज्यातील जनता आज
दुष्काळाने होरपळत आहे.आज जनतेने देखील या मंत्र्यांचाच आदर्श ठेवत बिल न भरले तर? मुख्यमंत्रयांचेच बिल भरले जात नाही राज्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे काय? संबंधित अधिकारी काय झोपा काढतात काय? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.