महिलेची लूट, गॅस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू
By Admin | Updated: July 13, 2015 01:36 IST2015-07-13T01:36:08+5:302015-07-13T01:36:08+5:30
महानगर गॅस कंपनीचे कर्मचारी बनून मुलुंडमधील ७६ वर्षीय महिलेला मारहाण करून लुटण्यात आले होते. याप्रकरणी नवघर पोलिसांनी ५२ गॅस कर्मचाऱ्यांची चौकशी केली

महिलेची लूट, गॅस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू
मुंबई : महानगर गॅस कंपनीचे कर्मचारी बनून मुलुंडमधील ७६ वर्षीय महिलेला मारहाण करून लुटण्यात आले होते. याप्रकरणी नवघर पोलिसांनी ५२ गॅस कर्मचाऱ्यांची चौकशी केली असून, अधिक तपास सुरू आहे.
मुलुंड पूर्वेकडील नवघर रोड येथे ७६ वर्षीय सरोजिनी नायडू राव पतीसोबत राहण्यास आहे. बुधवारी महानगर गॅस कंपनीतून गॅस रिडिंगसाठी आलेल्या तरुणाने त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली. महानगर गॅस कंपनीचे कर्मचारी बनून आलेल्या तरुणाने दुसऱ्या दिवशी घरात एकट्या असलेल्या राव यांच्या तोंडाला रुमाल बांधून दागिन्यांची लूट करून तो पसार झाला. यामध्ये त्यांचे २ लाख २८ हजारांचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू आहे.
याप्रकरणी महानगर गॅस कंपनीच्या कर्मचारी वर्गाच्या माहितीचा तपशील तपासण्यात येत आहे. आतापर्यंत ५२ कर्मचाऱ्यांची
चौकशी करण्यात आल्याची माहिती मुलुंड नवघर पोलिसांनी
दिली. (प्रतिनिधी)