BMC Municipal Schools News : मुंबईतील पालिका शाळांचं 'मुंबई पब्लिक स्कूल' असं नामांतर होणार; यामागचं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 01:16 PM2021-02-03T13:16:12+5:302021-02-03T13:26:14+5:30

BMC Budget 2021 Updates: BMC Municipal schools in Mumbai renamed as Mumbai Public School with new logo मुंबईतील महापालिका शाळांचं नाव आता बदलण्यात येणार

bmc Municipal schools in Mumbai renamed as Mumbai Public School with new logo | BMC Municipal Schools News : मुंबईतील पालिका शाळांचं 'मुंबई पब्लिक स्कूल' असं नामांतर होणार; यामागचं कारण काय?

BMC Municipal Schools News : मुंबईतील पालिका शाळांचं 'मुंबई पब्लिक स्कूल' असं नामांतर होणार; यामागचं कारण काय?

googlenewsNext

मुंबई महानगरपालिकाच्याशिक्षण विभागाचा सन २०२१-२२ वर्षासाठी अर्थसंकल्प शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांनी आज महापालिकेच्या सभागृहात सादर केला. यावेळी मुंबईतील शाळांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यात मुंबईतील महापालिका शाळांचं नाव आता बदलण्यात येणार असून पालिकेच्या शाळांना आता 'मुंबई पब्लिक स्कूल' असं संबोधण्यात येणार आहे. याशिवाय शाळेचं बोधचिन्ह देखील बदलण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी पालिकेच्या शाळांचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं संध्या दोषी यांनी यावेळी सांगितलं आहे. ( BMC Budget 2021 Updates)

मुंबईतील प्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यमिक विभागाच्या २२४ मनपा शाळांच्या मूळनावासह मुंबई पब्लिक स्कूल (एमपीएस) असं संबोधण्यात येणार आहे. 'एमपीएस'साठी नवा लोगोही तयार करण्यात येणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी २५ शाळांमध्ये जी क्लास अॅप्लिकेशन करुन देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यासाठी ५१ शिक्षक आणि २१० विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनं याचं शिक्षण दिल्याचीही माहिती देण्यात आली.

…अन् पाणी समजून सहआयुक्तांनी प्यायले सॅनिटायझर; शिक्षण अर्थसंकल्प मांडताना उडाला गोंधळ

विशेष म्हणजे, येत्या वर्षभरात मुंबई महापालिका क्षेत्रात १० नव्या सीबीएसई बोर्ड शाळा सुरू करणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. तसंच २४ शाळांमधील इयत्ता दहावीपर्यंतच्या शिक्षण सुविधा वाढविण्यात येणार आहेत. २०२०-२१ मध्ये इयत्ता ८ वीच्या १३ हजार ५५० मुलींना ५ हजार रकमेची मुदत ठेव योजनेतंर्गत उपस्थिती प्रोत्साहन भत्ता भारतीय डाक विभाग यांच्याद्वारे प्रमाणपत्रे देण्याची कार्यवाही सुरू असून प्राथमिक, माध्यमिक मिळून ५ कोटी ३४ लाखांची तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

शैक्षणिक अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे...

>> मुंबईतील महापालिका शाळांची नावं बदलून 'मुंबई पब्लिक स्कूल' करण्यात येणार, शाळेचा लोगोही बदलणार
>> महानगरपालिका शाळा सुरू करताना एसओपीनुसार हँड सॅनिटायझर, थर्मोमीटर, हँडवॉश , पल्स ऑक्सीमिटर , मास्कसाठी १५.९० कोटींची तरतूद 
>> पहिले अक्षर कार्यक्रमांतर्गत १२ विभागातील ५०० शिक्षक व ३000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
>> २७९ मराठी माध्यमाच्या बालवाडी वर्गांमध्ये ६ महिन्याच्या कालावधीसाठी रॉकेट लर्निंग व आकांक्षा फाऊंडेशन या एनजीओमार्फत प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात येणार
>> उच्च प्राथमिक शाळा भविष्यात इयत्ता १० वीपर्यंत वाढवण्यात येईल. लवकरच २४ माध्यमिक शाळा सुरू करण्याचा महापालिकेचा मानस
>> बालवाडी सक्षमीकरणसाठी स्वयंसेवी संस्थांशी करार
>> 24 विभागनिहाय संगीत अकादमी उभारण्याच्या कामासाठी 10 लाखांची तरतूद
>> डिजिटल क्लासरूमची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून प्रथमिकसाठी 23. 58 तर माध्यमिकसाठी 5 कोटींची तरतूद
>> मार्च 2021 पर्यंत शालेय इमारती,दुरुस्ती , पुनर्बांधणीची 43 मोठी कामे व 8 कामे पुढील आर्थिक वर्षात करण्यात येणार आहेत.

Read in English

Web Title: bmc Municipal schools in Mumbai renamed as Mumbai Public School with new logo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.