राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांपैकी सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिंदेसेनेने जोरदार मुसंडी मारली. तब्बल २० वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. पण त्यांना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. मुंबईत भाजप-शिंदेसेना विरूद्ध ठाकरे बंधू अशी थेट लढत होती. ठाकरे बंधूंनी मराठी माणूस हा मुद्दा प्रचारात वापरला, तर भाजप-शिंदेसेनेने विकास या मुद्द्यावर प्रचार सुरु ठेवला. या प्रचारात भाजप-शिंदेसेनेच्या विकासाने बाजी मारली. दुपारी १ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, भाजप ९२ जागांवर, शिंदेसेना २६ जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे उद्धवसेना ६० तर राज ठाकरेंची मनसे केवळ ९ जागांवर आघाडीवर आहे. मुंबई महानगरपालिका निकालाचे सर्व अपडेट्स इथे पहा Live.
ठाकरे बंधू एकत्र, पण विजयाची हुलकावणी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने जोरदार मुसंडी मारली. गेल्या दोन दशकांपासून मुंबईवर असलेल्या ठाकरे कुटुंबाच्या वर्चस्वाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला. विकासाच्या मुद्द्याने 'मराठी कार्ड'वर मात केल्याचे चित्र दिसून आले. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र मैदानात उतरले होते. मुंबईत 'मराठी माणूस' आणि 'मुंबईची अस्मिता' हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून ठाकरे बंधूंनी भावनिक साद घातली होती. मात्र, मुंबईकरांनी या भावनिक आवाहनापेक्षा महायुतीच्या 'विकास' अजेंड्याला अधिक पसंती दिली.
भाजप आणि शिंदेसेनेने प्रचारात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबईत सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांवर भर दिला होता. मेट्रोचे जाळे, कोस्टल रोड आणि ट्रान्स हार्बर लिंक यांसारख्या मोठ्या प्रकल्पांच्या जोरावर महायुतीने मतदारांना साद घातली. दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त ताकदीसमोर भाजपने लावलेली तगडी फिल्डिंग यशस्वी ठरली आहे. या निकालामुळे मुंबई महानगरपालिकेतील सत्तेची समीकरणे आता पूर्णपणे बदलणार असून, मुंबईत आता पहिल्यांदा भाजपचा महापौर बसणार आहे, हे निश्चित झाले आहे.
मुंबईतील मराठी पट्ट्यात ठाकरे बंधूंना आपली ताकद दाखवण्याची संधी होती. पण त्यांना त्यापद्धतीची कमाल करता आली नाही. जाणून घ्या, मुंबईतून कोणत्या वॉर्डातून कोण विजयी झाले, पाहूया.
मुंबईतील सर्व 227 वॉर्डमधील विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग क्रमांक 1 - रेखा यादव - शिवसेना
प्रभाग क्रमांक 2 - तेजस्वी घोसाळकर - शिवसेना
प्रभाग क्रमांक 3 - प्रकाश दरेकर - भाजप
प्रभाग क्रमांक 4 - मंगेश पंगारे - शिवसेना
प्रभाग क्रमांक 9 - शिवानंद शेट्टी - भाजप
प्रभाग क्रमांक 19 - प्रकाश तावडे - भाजप
प्रभाग क्रमांक 20 - दीपक तावडे - भाजप
प्रभाग क्रमांक 32 - गीता भंडारी - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रभाग क्रमांक 33 - मोईन सिद्दिकी - काँग्रेस
प्रभाग क्रमांक 36 - सिद्धार्थ शर्मा - भाजप
प्रभाग क्रमांक 37 - योगिता कदम - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रभाग क्रमांक 50 - विक्रम राजपूत - भाजप
प्रभाग क्रमांक 52 - प्रीती साटम - भाजप
प्रभाग क्रमांक 72 - ममता यादव - भाजप
प्रभाग क्रमांक 73 - लोना रावत - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रभाग क्रमांक 87 - पूजा महाडेश्वर - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रभाग क्रमांक 103 - हेतल गाला - भाजप
प्रभाग क्रमांक 104 - प्रकाश गंगाधरे - भाजप
प्रभाग क्रमांक 194 - निशिकांत शिंदे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रभाग क्रमांक 123 - सुनील मोरे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रभाग क्रमांक 124 - सकिना शेख - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रभाग क्रमांक 134 - मेहजबीन खान - एमआयएम
प्रभाग क्रमांक 135 - नवनाथ बन - भाजप
प्रभाग क्रमांक 137 - समीर पटेल - एमआयएम
प्रभाग क्रमांक 145 - खैरुनिसा हुसेन - एमआयएम
प्रभाग क्रमांक 147 - प्रज्ञा सदाफुले - शिवसेना
प्रभाग क्रमांक 156 - अश्विनी माटेकर - शिवसेना
प्रभाग क्रमांक 157 - सरिता म्हसके - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रभाग क्रमांक 165 - अशरफ आझमी - काँग्रेस
प्रभाग क्रमांक 172 - राजश्री शिरवाडकर - भाजप
प्रभाग क्रमांक 182 - मिलिंद वैद्य - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रभाग क्रमांक 184 - आशा काळे - काँग्रेस
प्रभाग क्रमांक 185 - जगदीश थेवलपील - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रभाग क्रमांक 200 - उर्मिला पांचाळ - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रभाग क्रमांक 201 - इरम सिद्दिकी - समाजवादी पार्टी
प्रभाग क्रमांक 207 - रोहिदास लोखंडे - भाजप
प्रभाग क्रमांक 210 - सोनम जमसुतकर - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रभाग क्रमांक 214 - अजय पाटील - भाजप
प्रभाग क्रमांक 215 - संतोष ढाले - भाजप
Web Summary : In Mumbai's BMC election, BJP-Shinde Sena gained significant ground. Despite Uddhav and Raj Thackeray uniting after 20 years, they underperformed. BJP-Shinde Sena focused on development, while the Thackerays emphasized Marathi identity. As of 1 PM, BJP led in 92 wards, Shinde Sena in 26, Uddhav Sena in 60, and MNS in 9.
Web Summary : मुंबई बीएमसी चुनाव में, बीजेपी-शिंदे सेना ने महत्वपूर्ण बढ़त हासिल की। उद्धव और राज ठाकरे के 20 वर्षों बाद एकजुट होने के बावजूद, उनका प्रदर्शन कम रहा। बीजेपी-शिंदे सेना ने विकास पर ध्यान केंद्रित किया, जबकि ठाकरे ने मराठी पहचान पर जोर दिया। दोपहर 1 बजे तक, बीजेपी 92 वार्डों में, शिंदे सेना 26 में, उद्धव सेना 60 में और एमएनएस 9 में आगे थी।