BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 21:55 IST2026-01-11T21:38:06+5:302026-01-11T21:55:16+5:30
आज मुंबईतील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा झाली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली.

BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
BMC Elections 2026 : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. आज शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा झाली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी भाजपावर टीका केली. 'साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका, अशा अनेक गोष्टी आहेत. कालपरवा अण्णा मलाई येऊन गेले काय बोलले,त्यांची भूमिका अशी आहे की मुंबई ही महाराष्ट्राची नाहीये. मुंबई पुन्हा तोडण्याचा डाव सुरु झालेला दिसतोय त्यामुळे आपण सावध व्हायला पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...
जयंत पाटील म्हणाले,उद्धव ठाकरेजी तुम्ही उशिरा आलात पण आक्रमक आणि मुद्देसूद भाषण आदित्य ठाकरेंचे मी ऐकले, मुंबईची नस, मुंबईला काय पाहिजे, मुंबईला काय हवंय याची ओळ नं ओळं आदित्य ठाकरेंना माहिती आहे. उद्धवजी मुंबईची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे देऊन तुम्ही महाराष्ट्राकडे लक्ष द्या, असंही पाटील म्हणाले.
"बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दामुळे मुंबई मराठी माणसाची ही भावना देशभर पसरली. ते होते या मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानानं ठामपणे उभा राहिला हे महाराष्ट्रात कोणी विसरता कामा नये. आजच्या मंचावरील पोस्टर पाहून आनंद होतोय की भावकी एक झाली आहे. मुंबईत फिरलो लोकांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा लोकांना आनंद झाला आहे, असंही पाटील म्हणाले.
राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव
राज ठाकरे म्हणाले की, २०२४ साली मला एक व्यक्ती भेटली. त्याने मला जी माहिती दिली. तसेच ती माहिती दिल्यानंतर माझी माणसं माझी रिसर्ज टीम कामाला लागली. त्यामधून जी काही माहिती समोर आली ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तसेच मी आज जे दाखवणार आहे ते पाहून समजा तुम्हाला भीती नाही वाटली, तर मला असं वाटतं की या देशात निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या.
२०२४ नंतर मला हे सारं समजू लागलं. साधारणत: विधानसभा निवडणुकीच्या आसपास आमच्या रिसर्च टीमकडून या सगळ्या गोष्टी मला कळायला लागल्या. ते पाहून मला धक्का बसायला लागला. आपण डोळे झाकून बसतो आणि आपल्या खालून काय खणलं जातं हे आपल्याला कळतच नाही. अनेक हिंदी इंग्रजी वृत्तवाहिन्यांना ब्लॉक करून टाकलेलं आहे. कुणी काही तुम्हाला दाखवणार पण नाही. काही दाखवलं की वरनं फोन येतो, जाहिराती बंद केल्या जातील म्हणून दट्ट्या बसतो, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.