"७० हजार कोटींचे आरोप तुम्ही आणि मोदींनी केले, ढिगभर पुरावे दिले. केस चालू आहेत म्हणताय, पुरावे तुम्ही दिले ते पुरावे की जाळावे कोर्टाने सांगावं. तुम्हाला माहीत आहे पुरावे दिले, तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या. नसेल तर अजित पवारांची माफी मागा, हेच तुमचे चाळे चालू आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली. आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा झाली. यावेळी ठाकरेंनी भाजपावर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचं हिंदुत्व हे ढोंग आहे. काश्मीरमध्ये माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला. त्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्यात आला, ऑपरेशन सिंदूर केलं, आणि काही दिवसांनी याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला शहांचे चिरंजीव पुढे, हे यांचं देशप्रेम?
उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर आघाडी केली तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग फडणवीस अंबरनाथमध्ये तुम्ही असं काय सोडलं? ईदच्या दिवशी मोदींना लहानपणी मुस्लिम कुटुंबाकडून जेवण यायचं. सौगात ए मोदी केली तरी चालतं. आम्ही साधं अमर शेखचं नाव घेतलं तर आम्ही हिंदूत्व सोडलं? तुम्ही जे करताय ते काय अमरप्रेम आहे का?, असा सवालही ठाकरेंनी केला.
Web Summary : Uddhav Thackeray slammed BJP, demanding either proof against Ajit Pawar or a public apology. He questioned their Hindutva and criticized their alliances, accusing them of hypocrisy during a joint rally with Raj Thackeray.
Web Summary : उद्धव ठाकरे ने भाजपा पर हमला बोलते हुए अजित पवार के खिलाफ सबूत या सार्वजनिक माफी की मांग की। उन्होंने उनके हिंदुत्व पर सवाल उठाया और उनके गठबंधनों की आलोचना करते हुए राज ठाकरे के साथ एक संयुक्त रैली में पाखंड का आरोप लगाया।