पश्चिम उपनगरात ठाकरे बंधूंच्या शाखांना भेटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:07 IST2026-01-08T13:07:18+5:302026-01-08T13:07:39+5:30
दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

पश्चिम उपनगरात ठाकरे बंधूंच्या शाखांना भेटी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पश्चिम उपनगरात पक्षांच्या शाखांना भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
राज ठाकरे यांनी विलेपार्ले ते दहीसर येथील २० शाखांना भेटी दिल्या. उद्धव ठाकरे यांनी अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, दहीसर येथील विविध शाखांना भेटी देऊन शिवसैनिकांचे मनोबल वाढविले.
पश्चिम उपनगरातील प्रमुख शाखांमध्ये ठाकरेबंधूनी कार्यकर्त्याच्या अडचणी, संघटनात्मक प्रश्न आणि स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती जाणून घेतली. मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकजूट गरजेची असल्याची भावना कार्यकर्त्यांनी मांडली.