मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे संतापून म्हणाले, "याला खड्ड्यात घाल, त्याला खड्ड्यात घाल, अशी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 14:25 IST2026-01-23T14:21:13+5:302026-01-23T14:25:44+5:30

मुंबईत शिवसेनेचा महापौर होणार का याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

BMC Election 2026 Next Mumbai Mayor will be from Mahayuti declares DCM Eknath Shinde | मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे संतापून म्हणाले, "याला खड्ड्यात घाल, त्याला खड्ड्यात घाल, अशी..."

मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे संतापून म्हणाले, "याला खड्ड्यात घाल, त्याला खड्ड्यात घाल, अशी..."

Eknath Shinde on BMC Mayor: मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा पेच सुटल्यानंतर आता सर्वांच्या नजरा मुंबईचा महापौर कोण होणार, याकडे लागल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिंदेसेनेने महापौरपदावर आपला दावा ठोकल्याची चर्चा आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापौर पदाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणार असल्याचे म्हटले. तसेच सत्तेची खुर्ची महत्त्वाची नसून मुंबईकरांना काय देणार हा अजेंडा असल्याचे म्हटले.

२३ जानेवारी २०२६ पासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या ऐतिहासिक वर्षात मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवावा आणि शिवसेनेचाच महापौर असावा, अशी आग्रही मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी ही भावना व्यक्त केली होती. दुसरीकडे भाजपने ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे महापौरपदावर आपला हक्क सांगितला आहे. एकनाथ शिंदेंनी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला सुचवला असला तरी, भाजप आपलाच महापौर व्हावा यावर ठाम असल्याचे दिसते.

एकनाथ शिंदेंची भूमिका

महापौरपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संतापून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केले. मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल असं एकनाथ शिंदे म्हणाले. 


"मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल. आमची युती आहे. त्यांच्यासारखी याला खड्ड्यात घाल त्याला खड्ड्यात घाल अशी युती नाही. खुर्ची आणि सत्ता हा आमचा अजेंडा नाही. आम्ही मुंबईकरांना काय देणार आहोत हे महत्त्वाचे आहे. मुंबईकरांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. आता या पाच वर्षांमध्ये मुंबईला जागतिक स्तरावरील शहरासारखी करणार. पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की मुंबईल फिनटेक कॅपिटल करणार. मुंबई जागतिक आर्थिक केंद्र झालं पाहिजे असं ते म्हणाले. पण विरोधकांकडून लगेच आरडाओरड सुरु झाली की, मुंबई तोडणार. पण मराठी माणूस तुमच्यामुळेच बाहेर गेला. मुंबईकरांना जीवनात काय मिळणार हा आमचा अजेंडा आहे," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
 

Web Title : क्या शिवसेना का उम्मीदवार होगा मुंबई का महापौर? शिंदे ने किया स्पष्ट।

Web Summary : एकनाथ शिंदे ने जोर देकर कहा कि अगला मुंबई महापौर महायुति गठबंधन से होगा, आंतरिक विवादों के दावों को खारिज किया। ध्यान सिर्फ मेयर की सीट हासिल करने पर नहीं, बल्कि मुंबईकरों के लिए काम करने पर है, जिसका लक्ष्य एक वैश्विक स्तर का शहर बनाना है।

Web Title : Will Shiv Sena's candidate be Mumbai's mayor? Shinde clarifies.

Web Summary : Eknath Shinde asserts the next Mumbai mayor will be from the Mahayuti alliance, dismissing claims of internal disputes. The focus is on delivering for Mumbaikars, not just securing the mayoral seat, aiming for a global-standard city.