मराठी टक्का वाढवण्यास ठोस आराखडा आहे का? गेली २० वर्षे ज्यांची सत्ता होती…: प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 05:54 IST2026-01-07T05:53:57+5:302026-01-07T05:54:08+5:30
प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली. या सभेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा आगामी आराखडाही मांडला.

मराठी टक्का वाढवण्यास ठोस आराखडा आहे का? गेली २० वर्षे ज्यांची सत्ता होती…: प्रकाश आंबेडकर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी होत असल्याची केवळ चर्चा होते, मात्र हा टक्का वाढवण्यासाठी तुमच्याकडे ठोस आराखडा आहे का? गेल्या २० वर्षांत ज्यांची सत्ता होती, त्यांनी महापालिकेचा उपयोग मराठी माणसाला घर आणि रोजगार देण्यासाठी का केला नाही, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
विक्रोळीतील पार्क साइट परिसरात झालेल्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली. या सभेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा आगामी आराखडाही मांडला. महापालिकेच्या मालकीच्या तसेच मोकळ्या जागांचा वापर मराठी माणसाचा टक्का वाढवण्यासाठी केला पाहिजे. तसेच नागरिकांनी भरलेला कर हा लूटमारीसाठी नव्हे, तर लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वापरला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.