‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:32 IST2026-01-09T13:31:01+5:302026-01-09T13:32:22+5:30
Mumbai Municipal Corporation Election 2026: मुंबईमध्ये महायुती सत्तेवर आल्यास मुंबईचं पुन्हा बॉम्बे असं नामकरण होईल, असा दावा नुकत्याच दिलेल्या संयुक्त मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला आता भाजपाचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा
मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र लढत असलेल्या ठाकरे बंधूंनी भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. तसेच मुंबईतील मराठी माणसाचे हित आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर प्रचार केंद्रित करून महायुती सत्तेत आल्यास मुंबईच्या अस्तित्वचं धोक्यात येईल, असा दावा ठाकरे बंधूंकडून केला जात आहे. दरम्यान, मुंबईमध्ये महायुती सत्तेवर आल्यास मुंबईचं पुन्हा बॉम्बे असं नामकरण होईल, असा दावा नुकत्याच दिलेल्या संयुक्त मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला आता भाजपाचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना केलेल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले की, महायुती सत्तेत आली तर मुंबईचं परत बॉम्बे करून टाकतील, हे तर शक्यच नाही. मात्र उद्धव ठाकरे हे सत्तेत आले तर मुंबईचं मोहम्मद लँड नक्कीच करून टाकतील, असा दावा नितेश राणे यांनी केला.
उद्धव मामु बोलतात की..
— Nitesh Rane (@NiteshNRane) January 9, 2026
महायुती सत्तेत आली तर मुंबई च परत बॉम्बे करून टाकतील..
ते तर शक्यच नाही!
पण उद्धव मामु सत्तेत आले..
तर मुंबई च.. “मोहम्मद लैंड” नक्कीच करून टाकतील !
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वेगळी होती आणि उद्धव ठाकरेंची वेगळी आहे. मराठी माणूस, हिंदू समाजाला मुंबईत सुरक्षित ठेवण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. मात्र त्यांच्यानंतर पुढच्या पिढीने नेमका विरोधाभास केला आहे. पूर्वी शिवसेना आहे म्हणून मुंबई आहे, असं म्हटलं जायचं आता उद्धव ठाकरे आहेत म्हणून बांगलादेशी आणि रोहिंगे आहेत, असं नवं समीकरण झालेलं आहे, असा आरोपही नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधून केला आहे.
उद्धव ठाकरेंचं राज्य असलेल्या मुंबईमध्ये टिस्सच्या अहवालानुसार बांगलादेशी आणि रोहिंगे हे वाढत चालले आहेत. २०३० पर्यंत हा टक्का आणखीनच वाढत चाललेला आहे, असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे.