संजय राऊत दिसताच एकनाथ शिंदेंनी नमस्कार केला, संवाद साधला; प्रकृतीचीही विचारपूस केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 10:40 IST2026-01-09T10:39:08+5:302026-01-09T10:40:35+5:30
त्यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

संजय राऊत दिसताच एकनाथ शिंदेंनी नमस्कार केला, संवाद साधला; प्रकृतीचीही विचारपूस केली
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत हे गुरुवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने समोरासमोर आले. यावेळी दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केले. शिंदे यांनी राऊत यांना नमस्कार केला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
एकनाथ शिंदे एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन बाहेर येत होते. त्यानंतर लगेचच राऊत यांची मुलाखत होती. ते स्टुडिओकडे जात असताना शिंदे समोरून आले. त्यावेळी शिंदे यांनी राऊत यांना नमस्कार केला आणि प्रकृतीची विचारपूस केली. राऊत यांनीही शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एक-दोन मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला.
राऊत हे नुकतेच एका मोठ्या आजारातून बाहेर आले आहेत. ते आजारी असताना शिंदे यांनी राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.