Tipu Sultan, BJP vs Congress: "टिपू सुलतानाच्या औलादांनी भाजपावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर..."; भाजपाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:10 IST2022-02-02T18:10:03+5:302022-02-02T18:10:57+5:30
"जो कोणी विनाकारण भाजपच्या अंगावर येईल, त्याला शिंगावर घेण्याची ताकद भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे, हे काँग्रेसने लक्षात ठेवावं"

Tipu Sultan, BJP vs Congress: "टिपू सुलतानाच्या औलादांनी भाजपावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर..."; भाजपाचा इशारा
Tipu Sultan, BJP vs Congress: "टिपू सुलतानाच्या औलादांनी भाजपावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना त्याचं पद्धतीने उत्तर देऊ. आम्ही संघर्ष करणारी लोकं असून भाजपाच्या वसंत स्मृतीवर हल्ला करत असाल किंवा भाजपा कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न कराल तर 'जशास तसं' उत्तर दिलं जाईल", असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी युवक काँग्रेस आंदोलक आमदार झिशान सिद्दीकी यांना दिला.
जो कोणी विनाकारण मुंबई भाजपच्या अंगावर येईल, त्याला शिंगावर घेण्याची ताकद भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) February 2, 2022
हे काँग्रेसने लक्षात ठेवावे! pic.twitter.com/8QSjnxn9oK
पेगॅसस प्रकरणाबाबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दादर येथील वसंत स्मृती मुंबई भाजपा कार्यालयावर मोर्चा काढला होता. युवक काँग्रेसचा हा मोर्चा यशस्वी होऊ न देण्याच्या दृष्टीने भाजपा कार्यकत्यांना त्या आंदोलकांना हुसकावले. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजपाने 'जशास तसे उत्तर' देण्यासाठी युवक काँग्रेस विरोधात आंदोलनाचा पवित्रा उचलला. 'दाऊद की औलादों को जूते मारो', अशा घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसने मुंबई भाजपा विरोधात केलेला मोर्चा उधळून लावला.
"युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई भाजपा कार्यालयावर यायच्या आधीच त्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी रोखलं. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा भारत मातेवर विश्वास आहे. भाजपा कार्यालयाकडे बोटं दाखवणाऱ्या दाऊद आणि टिपू सुलतानच्या औलादींवर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर भाजपचे कार्यकर्ते त्यांना धडा शिकवतील. आज पोलिसांच्या विनंतीमुळें थांबत आहोत, परंतु काँग्रेस कार्यकर्ते भाजपाच्या वसंत स्मृतीवर हल्ला करत असतील, तर आम्ही हल्ल्याचे चोख उत्तर हल्ल्यानेच देऊ", अशी रोखठोक प्रतिक्रिया मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली.