“मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी”; उद्धव ठाकरेंच्या ‘वंदे भारत’ प्रवासावरुन भाजपचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 14:32 IST2024-02-06T14:28:38+5:302024-02-06T14:32:15+5:30
BJP Vs Thackeray Group: कुठे आहे विकास? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटते, असे भाजपाने म्हटले आहे.

“मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी”; उद्धव ठाकरेंच्या ‘वंदे भारत’ प्रवासावरुन भाजपचा टोला
BJP Vs Thackeray Group: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत झाली. ठिकठिकाणी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि केंद्र सरकावर तसेच राज्य सरकारवर सडकून टीका केली. हा कोकण दौरा आटपल्यावर उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक चिपळूण ते मुंबई असा प्रवास वंदे भारत ट्रेनने केला. यावरून भाजपाने टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी यांनी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास केला. यावरून भाजपाने अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली असून, उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी... वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास... तिसरी बार..... मोदी सरकार !, अशी पोस्ट भाजपाने एक्सवर केली आहे. तर उद्धव ठाकरे यांचा वंदे भारत ट्रेनने प्रवास करतानाचा फोटोही शेअर केला आहे.
लवकरच बुलेट ट्रेनची देखील सफर घडवून आणणार हे नक्की
दुसऱ्या एका पोस्टमध्ये भाजपने म्हटले आहे की, हीच तर मोदींची गॅरंटी आहे. कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटते. लवकरच बुलेट ट्रेन ची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण, मोदी हैं तो मुमकीन हैं, अशी दुसरी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये दुसरा एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह मिलिंद नार्वेकर आणि खासदार विनायक राऊत दिसत आहेत.
दरम्यान, भाजपाने केलेल्या एक्सवरील पोस्टला महाविकास आघाडीने अधिकृत हँडलवरून उत्तर दिले आहे. कोस्टल रोड, MTHL ही ठाकरेंची गॅरेंटी होती, पण क्रेडीट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटनाची घाई होतेय. MTHL अनेक महिने तयार असूनही उद्धाटनाला विलंब केला आणि आता कोस्टल रोड तयार नसूनही उद्धाटनाची घाई चाललीये. पण तुम्ही कितीही घाई केलीत तरी मुंबईचे हाल करणाऱ्या खोके सरकारला जनतेच्या मनात क्रेडीट मिळणार नाहीच!, असा पलटवार महाविकास आघाडीने केला आहे.
हीच तर #ModiKiGuarantee
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 6, 2024
कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेन मधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं.
लवकरच बुलेट ट्रेन ची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण #ModiHaiToMumkinHai#विरोधक_देखील_लाभार्थी@ShivSenaUBT_@OfficeofUTpic.twitter.com/KnznkvNU3d