Join us  

मनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात; भाजपा नेत्यानं सांगितलं वेगळंच 'राज'कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 3:49 PM

मनसेकडून नव्या झेंड्याचं अनावरण; आज संध्याकाळी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार

मुंबई: मनसेच्या बदललेल्या झेंड्यामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं डोकं असल्याचा दावा भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केला. शिवसेना सत्तेसाठी हिरवी झाली. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढून भाजपाला मिळणाऱ्या हिंदू मतांचं विभाजन करण्यासाठीच मनसेनं भूमिका बदलल्याचं हाके म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरेंना शरद पवारांची फूस असल्याचा अप्रत्यक्ष आरोपच हाकेंनी केला. 'हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी रुजवला, काहींना आता पालवी फुटली' मनसेच्या बदललेल्या झेंड्यामागे वेगळंच राजकारण असल्याचं हाकेंनी सांगितलं. 'या सगळ्यामागे शरद पवारांचं डोकं आहे. शिवसेना सत्तेसाठी हिरवी झाली आहे. त्यामुळे हिंदूंची एकगठ्ठा मतं आता भाजपाकडे जाऊ शकतात. याच मतांचं विभाजन करण्यासाठी मनसेनं त्यांचा झेंडा बदलला आहे. या सगळ्यामागे शरद पवारांचा हात आहे. त्यांच्याकडूनच मनसे प्रमुख राज ठाकरेंना प्रोत्साहन दिलं जात आहे,' असा दावा हाकेंनी केला.लहान माझी बाहुली तिची मोठी सावली; झेंडा बदलताच राष्ट्रवादीनं केलं राज ठाकरेंना टार्गेटशरद पवारांनी हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी डाव आखला आहे. मात्र यामध्ये त्यांना यश येणार नाही, असंदेखील हाके पुढे म्हणाले. 'मनसेनं झेंडा बदलला आहे. हिंदू मतांसाठी ते भूमिकादेखील बदलतील. मात्र खरा हिंदुत्ववादी कोण ते जनता ओळखून आहे. त्यामुळे जनता यांच्या जाळ्यात फसणार नाही आणि त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही,' असा विश्वास हाकेंनी व्यक्त केला. ...अन् फ्रॅक्चर असतानाही 'त्या' मनसैनिकानं लावली मनसेच्या अधिवेशनाला उपस्थितीविरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी मनसे आणि भाजपा एकत्र येणार का, अशी चर्चा झाली होती. त्यावर आम्हाला अशा पक्षांची गरज नाही, अशी स्पष्ट भूमिका हाकेंनी मांडली. 'भाजपाची राज्यासह संपूर्ण देशात चांगली ताकद आहे. आम्ही स्वत:च्या सामर्थ्यावर राज्यात आणखी वाढू. त्यासाठी आम्हाला अशा तकलादू पक्षांची गरज नाही. रोज विचार बदलणाऱ्यांना आम्ही विचारत नाही. त्यामुळे अशांसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही,' असं हाके म्हणाले. 

टॅग्स :शरद पवारराज ठाकरेमनसेराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाशिवसेनादेवेंद्र फडणवीस