...तरी विरोधकांचे संख्याबळ इतकेच झाले असते; मुंबईच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 05:34 IST2026-02-08T05:34:07+5:302026-02-08T05:34:58+5:30

विरोधी पक्षांकडून कोणीही अर्ज भरला नसल्याने त्यांचे सदस्य निवडी प्रक्रियेवेळी उपस्थित राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

BJP Ritu Tawade will be mayor of Mumbai, while Sanjay Ghadi of the Eknath Shinde faction of Shiv Sena will be deputy mayor in BMC | ...तरी विरोधकांचे संख्याबळ इतकेच झाले असते; मुंबईच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे बिनविरोध

...तरी विरोधकांचे संख्याबळ इतकेच झाले असते; मुंबईच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे बिनविरोध

मुंबई - मुंबई महापालिकेच्या महापौरपदी आणि उपमहापौरपदी कोण, हा सस्पेन्स शनिवारी संपला. भाजपाच्यारितू तावडे महापौरपदी विराजमान होणार आहेत, तर शिंदेसेनेचे संजय घाडी यांच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ पडणार, हे स्पष्ट झाले आहे. अन्य कोणत्याही पक्षाने उमेदवार रिंगणात न उतरवल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल. विशेष म्हणजे पक्षातील अन्य नगरसेवकांना संधी मिळावी म्हणून शिंदेसेनेने उपमहापौरपदाचा कालावधी सव्वा वर्ष ठेवला आहे. महापौर आणि उपमहापौर पदाचा कालावधी एरव्ही अडीच वर्षांचा असतो.

निवडीवर ११ फेब्रुवारीला शिक्कामोर्तब

महायुतीच्या उमेदवारांनी शनिवारी मुदतीच्या शेवटच्या दिवशी महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले. आता ११ फेब्रुवारीला पिठासीन अध्यक्षांच्या अधिपत्याखाली ही निवडणूक होईल. विरोधी पक्षांकडून कोणीही अर्ज भरला नसल्याने त्यांचे सदस्य निवडी प्रक्रियेवेळी उपस्थित राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

...म्हणून अपशकून करणार नाही : उद्धवसेना

उद्धवसेना उमेदवार देण्याची शक्यता होती. 'मातोश्री'वर शनिवारी पक्षाच्या नगरसेवकांना बोलावले होते. त्यामुळे उमेदवाराची घोषणा होईल, असे चित्र होते. याबाबत उद्धवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईचा महापौर हिंदू असेल अशी भूमिका भाजपाने सुरुवातीला घेतली होती. एका अर्थाने परप्रांतीय महापौरही असू शकतो, असे त्यांना सूचित करायचे होते. आम्ही मात्र महापौर मराठीच असेल, अशी भूमिका घेतली होती. भाजपाने मराठी महापौर दिला आहे, त्यामुळे आम्ही अपशकून करणार नाही. आमचे संख्याबळ कमी झाले असेल, मात्र आमची मराठीच्या अस्मितेची लढाई लढत राह, असेही त्या म्हणाल्या. 

कोणत्या पक्षाचे किती संख्याबळ ?

भाजपाचे ८९, उद्धवसेना ६५, शिंदेसेना २९, काँग्रेस २४, एमआयएम ८, मनसे ६, राष्ट्रवादी (अजित पवार) ३, समाजवादी पार्टी २, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १ असे २२७ उमेदवार विजयी झाले. भाजपाचे संख्याबळ सर्वाधिक आहे. भाजपा आणि शिंदेसेनेचे एकत्रित संख्याबळ ११८ आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) च्या एकमेव नगरसेवकाने महायुतीला समर्थन दिल्याने महायुती ११९वर पोहोचली आहे. काँग्रेस, एमआयएम, समाजवादी, राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी उद्धवसेना आणि मनसेला पाठिंबा दिला तरी त्यांचे संख्याबळ १०५ वर जाईल. साहजिकच त्यांन विरोधी पक्षात बसावे लागेल.

Web Title : भाजपा की रितु तावडे मुंबई की महापौर निर्विरोध चुनी गईं; विपक्ष कमजोर

Web Summary : भाजपा की रितु तावडे मुंबई की महापौर निर्विरोध चुनी गईं क्योंकि कोई और उम्मीदवार नहीं था। शिंदे सेना के संजय घाडी उपमहापौर हैं। उद्धव सेना ने मराठी महापौर का सम्मान करते हुए उम्मीदवार नहीं उतारा। भाजपा के बहुमत से जीत सुनिश्चित हुई।

Web Title : BJP's Ritu Tawade Elected Mumbai Mayor Unopposed; Opposition Lacked Numbers

Web Summary : BJP's Ritu Tawade became Mumbai's Mayor unopposed as no other candidate contested. Shinde's Sena's Sanjay Ghadi is Deputy Mayor. Despite Uddhav Sena's initial plans, they didn't field a candidate, citing respect for the Marathi Mayor. BJP holds the majority, securing the win.