Pankaja Munde News: राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक पार पडणार आहे. या ७ जागांपैकी ६ जागांवर महायुती तर एका जागेवर महाविकास आघाडी निवडून येण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वाधिक ४ जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहेत. तर शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळेल. दुसरीकडे महाविकास आघाडीत एका जागेवरून चढाओढ दिसून येते. उद्धवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एका जागेवरून खलबते सुरू असल्याचे म्हटले जात आहे. यातच राज्यसभेसाठी प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आहे, अशी माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ७ जागांच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी मुंबईत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी भाजपाकडून राज्यसभेसाठी काही नावे निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पंकजा मुंडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
राज्यसभेसाठी प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आहे
विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, राज्यसभेसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. त्यापैकी एक नाव प्रीतम मुंडे यांचे आहे. कारण त्या आधी खासदार होत्या. पण यावेळी पक्षाच्या आदेशानुसार मी लोकसभा लढवली होती. त्यानंतर प्रीतम मुंडे यांनी पक्षाचे काम केले, तसेच त्यांनी खासदार म्हणून काम केलेले आहे. आता प्रीतम मुंडे यांच्या नावाबरोबरच आणखी काही नावे चर्चेत आहेत. आता बाकी निर्णय आमच्या पक्षाचे सर्व नेते घेतील, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांत भाजपप्रमाणेच काँग्रेसची ताकदही काहीशी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या राज्यसभेत काँग्रेसचे २५ खासदार आहेत आणि पक्षाचे चार सदस्य निवृत्त होत आहेत. मात्र योग्य रणनीती केल्यास काँग्रेसला दोन अतिरिक्त जागा मिळू शकतात. भाजप राज्यसभेच्या १०३ जागांवरून १०८-१०९ पर्यंत पोहचू शकतो.
Web Summary : Pankaja Munde disclosed Pritam Munde's name is under consideration for Rajya Sabha. BJP's core committee met to discuss nominations for the upcoming Rajya Sabha elections where BJP is expected to win 4 seats out of 7 in Maharashtra. Final decision pending by party leaders.
Web Summary : पंकजा मुंडे ने खुलासा किया कि प्रीतम मुंडे का नाम राज्यसभा के लिए विचाराधीन है। भाजपा की कोर कमेटी ने आगामी राज्यसभा चुनावों के लिए नामांकन पर चर्चा करने के लिए बैठक की, जहाँ भाजपा को महाराष्ट्र में 7 में से 4 सीटें जीतने की उम्मीद है। पार्टी नेताओं द्वारा अंतिम निर्णय लंबित है।